Poonam Pandey in Lock Upp
Poonam Pandey in Lock Upp

Lock Upp show : सर्वांसमोर शर्टची चेन खोलणं पडलं महागात, पुनम पांडे ‘लॉक अप’मध्ये!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

पॉर्न अभिनेत्री पुनम पांडे सध्या चर्चेत आली आहे. तिला सर्वांसमोर शर्टची चेन खोलणं महागात पडलंय. यामुळे तिला लाॅकअपमध्ये बंद करण्यात आलंय. हे प्रत्यक्षात घडलं नसली तरी हा एका शोचा भाग आहे. त्याचं नाव आहे 'लॉक अप'. (Lock Upp show) या शोमध्ये ती तिसरी स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ALTBalaji आणि MX Player वर प्रसारित होणार्‍या 'लॉक अप' (Lock Upp show ) या रिअॅलिटी शोची सध्या चर्चा होत आहे. हा शो कंगना राणौत होस्ट करतेय. अनेक अफवा आणि पुढच्या स्पर्धकाबद्दलच्या अनुमानांनंतर या शोमध्ये तिसरी स्पर्धक म्हणून पूनम पांडे सहभागी झालीय. (Lock Upp show ) निशा रावल आणि मुनावर फारुकी यांच्यासोबत सामील होणारी ती तिसरी कैदी आहे. मॉडेलिंग आणि इंटरनेट जगतातील लोकप्रिय नाव म्हणजे पूनम पांडे होय. एका मुलाखतीत तिने ११ वर्षांपूर्वी गाजलेल्या प्रसंगामागील कारण सांगितलं.

२०११ मध्ये जेव्हा क्रिकेट वर्ल्डकपवर जगाच्या नजरा होत्या की, कोण जिंकेल? तेव्हा मॉडल पूनमने एक वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिला. तिने वक्तव्य केले होते की, भारत जिंकला तर ती न्यूड होऊन स्टेडियममध्ये जाईन. आता या प्रसंगाच्या ११ वर्षांनंतर पूनमने आपल्या वादग्रस्त वक्तव्यामागचं कारण सांगितलं आहे. सर्वात बोल्ड अभिनेत्री पूनम पुन्हा एकदा आपल्या जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

मुलाखतीत उघडले रहस्य

पूनम OTT वरील कंगना रनौतचा शो 'लॉकअप'मध्ये सहभागी होईल. या शोमध्ये सर्व सेलेब्रिटीज असे आहेत, जे वादग्रस्त ठरले आहेत. पूनम देखील अनेकदा वादग्रस्त घटनांवरून चर्चेत आलीय. आता तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिने त्यावेळी असं का म्हटलं होतं. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा केला.

आता खरं रुप समोर येईल

या शोमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर पूनम म्हणाली की, आता लोक तिला एका सिलेब्रिटी म्हणून ओळखतात. लोक मला एक अशी अभिनेत्री म्हणून ओळखतात, जी वादात राहते आणि बोल्ड ॲक्ट करते. आता लोक खऱ्या पूनमला ओळखतील.

पूनम म्हणाली की, २०११ मध्ये कि तिने वर्ल्ड कप दरम्यान सर्व कपडे उतरवणार असल्याचं म्हटलं होतं. ती म्हणाली की, मी हे पब्लिसिटीसाठी म्हटलं होतं. कारण २०११ मध्ये मी प्रसिध्द अभिनेत्री नव्हते. मला फारसं कुणी ओळखायचं नाही. मी आउटसायडर होते आणि छोटी मॉडेल होते. मला एक मोठं प्लॅटफॉर्म हवा होता. आउटसायडर तोपर्यंत हेडलाईन्समध्ये येत नाहीत, जोपर्यंत कुणी बोल्ड बोलत नाही. त्यावेळी मी १८ वर्षांची होते. हे सर्व मी अटेंशन मिळवण्यासाठी केलं होतं.

तिने २०१३ मध्ये नशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या सहभागाने या रिअॅलिटी शोमध्ये हॉटनेसचा तडका पाहायला मिळतोय.

पूनम लॉकअप शोमध्ये आल्यानंतर म्हणाली की, मी हे सांगण्यास अतिशय उत्सुक आहे की मी भारतातील सर्वात मोठ्या वादग्रस्त शो 'लॉक अप'चा एक भाग आहे. तेथे काय होईल हे मला माहीत नाही. कारण मी जे काही वाचले आहे आणि पाहिले आहे. मला समजले आहे की मला माझ्या मूलभूत गरजांसाठी देखील एक कार्य करावे लागेल आणि या लॉक अपमध्ये कोणतीही लक्झरी नाही. म्हणून मी हे कसे करणार आहे हे मला माहित नाही. परंतु मी उत्साही आहे.

१६ लोकप्रिय सेलिब्रिटी स्पर्धकांसह होस्ट कंगना राणौतच्या तुरुंगात बंद आहेत. जे सर्वात मूलभूत सुविधांसाठी स्पर्धा करतील. कारण ते विजेतेपदासाठी लढतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news