Pariksha Pe Charcha 2024 : विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये तणाव कसा टाळायचा, पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ सल्ला

Pariksha Pe Charcha 2024 : विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये तणाव कसा टाळायचा, पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ सल्ला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आरामात बसा, 5-10 मिनिटे विनोदात घालवा. स्वत:मध्ये हरवून जा, परीक्षेतून बाहेर पडाल, मग प्रश्नपत्रिका हातात आल्यावर तुम्ही ते आरामात करू शकाल. परीक्षा हॉलमध्ये इतर विद्यार्थी किती वेगाने लिहित आहेत, तुमच्या पुढे कोण काय करत आहे हे विसरून जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या : 

दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यासोबत 'परीक्षा पे चर्चा' केली. हा कार्यक्रम दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा केली. बोर्ड परीक्षेपूर्वी तणाव आणि भीती कमी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी 10 मिनिटे विनोदात घालवा. त्यामुळे जेव्हा प्रश्नपत्रिका हातात येईल तेव्हा तुम्ही ती आरामात सोडवू शकाल. आपण इतर गोष्टींमध्ये अडकतो, त्यामुळे आपली ऊर्जा विनाकारण वाया जाते. आपण आपल्यातच हरवून राहिले पाहिजे. लहानपणापासून आपण अर्जुन आणि पक्ष्याच्या डोळ्याची गोष्ट ऐकत आलो आहोत, ती आपल्या जीवनातही लागू करा. आधी संपूर्ण पेपर वाचा आणि मग काय लिहायचे हे बघा. आज परीक्षेतील सर्वात मोठे आव्हान लेखन हे आहे, त्यामुळे सरावावर लक्ष केंद्रित करा. परीक्षेपूर्वी, विषय किंवा जे वाचले आहे त्याबद्दल लिहा आणि नंतर स्वतः दुरुस्त करा. कारण पोहायला येत असेल तर पाण्यात जाण्याची भीती वाटत नाही. जो सराव करतो त्याला खात्री असते की तो मात करेल. तुम्ही जितके जास्त लिहाल तितके अधिक धारदारपणा मिळेल. परीक्षा हॉलमध्ये इतर विद्यार्थी किती वेगाने लिहित आहेत, तुमच्या पुढे कोण काय करत आहे हे विसरून जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, असे मोदी यांनी सांगितले.

काही पालकांना वाटतं की आज परीक्षा असल्यामुळे आपल्या पाल्याला नवीन पेन मिळायला हवा, पण तो जो पेन रोज वापरतो तोच पेन मुलाने घ्यावा असा माझा आग्रह आहे. त्याला त्याच्या कपड्यांबद्दल त्रास देऊ नका, त्याने जे परिधान केले आहे ते त्याला घालू द्या. परीक्षेदरम्यान त्याला आरामदायक वाटू द्या. विद्यार्थ्यांच्या आव्हानांना पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे हाताळले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिक्षकांनी काय करावे? मोदी म्हणाले…

मुलांचा ताण कमी करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात नेहमी सकारात्मक नाते असले पाहिजे. शिक्षकाचे काम केवळ नोकरी करणे नसून विद्यार्थ्यांना जगण्याची ताकद देणे आहे. शिक्षकांच्या मनात विचार आला असेल की ते विद्यार्थ्याचा ताण कसा दूर करतील? तर पहिल्या दिवसापासून परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यासोबतचे आपले नाते वाढले पाहिजे. तरच परीक्षेच्या काळात तणाव निर्माण होणार नाही. ज्या दिवशी शिक्षक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी नाते प्रस्थापित करतील, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या छोट्या-छोट्या समस्यांबद्दलही त्यांच्या विचारांबद्दल तुमच्याशी बोलतील.

विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरावा की नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मोबाईल फोन वापरत असतील. असे काही विद्यार्थी असतील ज्यांना तासन्तास मोबाईल फोनची सवय लागली असेल. मोबाईलसारखी गोष्ट जी आपण रोज पाहतो ती देखील चार्ज करावी लागते. जर मोबाईलला चार्ज करावा लागला तर या शरीराचा वापर करावा की नाही? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news