Filmfare Awards : ’12वी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, विधु विनोद चोप्रा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक | पुढारी

Filmfare Awards : '12वी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट, विधु विनोद चोप्रा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२३ मधील सर्वात चर्चित १२ वी फेल चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांनी ६९ व्या फिल्मफेअर ॲवॉर्ड्समध्ये १२ वी फेलने दबदबा निर्माण केला आहे. विधु विनोद चोप्रा द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबत अनेक कॅटेगरीमध्येही पुरस्कार मिळाले आहेत.

संबंधित बातम्या –

विधु विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेयर ॲवॉर्ड मिळाला आहे. बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट मुव्ही एडिटिंगच्या कॅटेगिरीमध्येही १२ वी फेलने बाजी मारली. याशिवाय विक्रांत मेसीला १२वी फेल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. १२ वी फेल २०२३ सर्वात अधिक चर्चित चित्रपटांपैकी एक आहे.

कमी बजेट असून देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही चित्रपटाचे खूप कौतुक केले. आयएमडीबीवर देखील यास ९.२ रेटिंग मिळाले आहेत.

१२वी फेल मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे, जे आपल्या गरिबी आणि प्रत्येक संघर्षाचा सामना करत आयपीएस अधिकारी होतात. या चित्रपटात त्यांची आयआरएस अधिकारी पत्नी श्रद्धा जोशी यांच्यासोबतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

Back to top button