Boeing कडून अमेरिकेत २ हजार नोकरकपात, भारतातील कंपनीकडून करणार ‘आउटसोर्स’!

Boeing कडून अमेरिकेत २ हजार नोकरकपात, भारतातील कंपनीकडून करणार ‘आउटसोर्स’!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची विमान निर्मिती कंपनी बोईंग (Boeing) यावर्षी २ हजार व्हाईट-कॉलर नोकर्‍या कमी करणार आहे. ही नोकरकपात वित्त आणि मानवी संसाधन (finance and human resources) विभागात असेल, अशी पुष्टी बोईंगने केली आहे. बोईंग कंपनीचे मुख्यालय आर्लिंग्टन, व्हर्जिनिया येथे आहे. या कंपनीने २०२२ मध्ये १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तर २०२३ मध्ये १० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा बोईंगकडून करण्यात आली होती. पण आता काही पदे कमी केली जातील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त सिएटल टाइम्सने दिले आहे.

कंपनीने या वृत्ताची पुष्टी करत म्हटले आहे की "या वर्षी मुख्यतः वित्त आणि एचआरमधील २ हजार नोकऱ्या कमी केल्या जातील." बोईंगने अशीदेखील पुष्टी केली आहे की ते भारतातील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसकडे यापैकी एक तृतीयांश नोकऱ्या आउटसोर्स करत आहेत.
बोईंगने सोमवारी सांगितले की "ते त्यांची कॉर्पोरेट रचना सुलभ करत आहे." गेल्या महिन्यात बोईंगकडून सांगण्यात आले होते की ते काही सपोर्ट फंक्शन्समधील कर्मचारी वर्ग कमी करेल. अमेरिकेतील कॉर्पोरेट रचना सुलभ करण्यासाठी आणि उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी वित्त विभागातील सुमारे १५० नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली असल्याचे याआधी बोईंगकडून सांगण्यात आले आहे.

बोईंग कंपनी (Boeing) ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील विमाने, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना, निर्मिती आणि विक्री करते.

याआधी जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. नुकतीच डेल टेक्नॉलॉजीस इंक (Dell Technologies Inc) या दिग्गज कंपनीने देखील नोकरकपातीची घोषणा केली आहे. डेलमधून ६,६५० नोकऱ्या कमी केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news