नोकरकपातीच्या लाटेत आणखी एक धक्का, Dell मधून ६,६५० जणांना नारळ | पुढारी

नोकरकपातीच्या लाटेत आणखी एक धक्का, Dell मधून ६,६५० जणांना नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. आता डेल टेक्नॉलॉजीस इंक (Dell Technologies Inc) या दिग्गज कंपनीने देखील नोकरकपातीची घोषणा केली आहे. डेलमधून ६,६५० नोकऱ्या कमी केल्या जाणार असल्याचे वृत्त Bloomberg ने दिले आहे. कंपनीने याबाबत एक मेमो जारी केला आहे. कंपनीचे को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी जारी केलेल्या मेमोमध्ये, सध्या बाजारात अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर डेलने जगभरात कार्यरत असलेल्या ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. (Dell layoffs)

उद्योग विश्लेषक IDC ने म्हटले आहे की प्राथमिक आकडेवारी अशी दर्शवितो की २०२२ च्या चौथ्या तिमाहीत पर्सनल संगणक (personal computers) मागणीत झपाट्याने घट झाली आहे. डेलच्या पर्सनल संगणक मागणीत ३७ टक्के घट झाली आहे. डेल त्याच्या कमाईपैकी सुमारे ५५ कमाई PC विक्रीमधून करते.

डेलच्या या नोकरकपातीच्या टेक सेक्टरला मोठा धक्का बसला आहे. PC मार्केट असलेल्या HP Inc ने देखील नोव्हेंबरमध्ये ६ हजार नोकरकपात करण्याची घोषणा केली होती. Cisco Systems Inc आणि इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प प्रत्येकी सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहेत. कन्सल्टिंग फर्म चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस इंकच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये टेक सेक्टरने ९७,१७१ नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ६४९ टक्के अधिक आहे.

डेलने ऑक्टोबरमध्ये संपलेल्या कालावधीत विक्रीत ६ टक्के घट नोंदवली होती. यामुळे कंपनीने मोठ्या संख्येने नोकरकपातीची घोषणा केली आहे. या नोकरकपातीमुळे राउंड रॉक टेक्सास येथील डेल कंपनीच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या सहा वर्षांतील सर्वात कमी होणार आहे.

हे ही वाचा : 

 

Back to top button