नोकरकपातीच्या लाटेत आशेचा किरण! Airbus मध्ये १३ हजारांहून अधिक पदांची भरती

नोकरकपातीच्या लाटेत आशेचा किरण! Airbus मध्ये १३ हजारांहून अधिक पदांची भरती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात आहे. पण अशा परिस्थितीत बेरोजगारांसाठी एअरबस (Airbus) कंपनी नवा आशेचा किरण घेऊन समोर आली आहे. एअरक्राफ्ट निर्मिती करणारी एअरबस ही युरोपियन कंपनी (European aircraft maker) २०२३ वर्षात १३ हजारांहून अधिक जणांची भरती करणार आहे.

एअरबसने २६ जानेवारी रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की कंपनीची यावर्षी १३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी भरती करण्याची योजना आहे. या नोकरभरतीत एअरबस कमर्शियल एअरक्राफ्ट ऑपरेशन पुढे नेण्यासाठी तसेच संरक्षण, अंतराळ आणि हेलिकॉप्टरशी संबंधित ७ हजार पदे असतील. ९ हजारांहून अधिक पदे युरोपासाठी भरली जातील आणि उर्वरित पदांची भरती जगभरातून (global network) केली जाईल.

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, एअरबसने म्हटले आहे की २०२२ मध्ये कंपनीने आधीच मोठ्या प्रमाणात भरती केली आहे. यामुळे जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख ३० हजारांवर गेली आहे. आता नव्या भरतीत एक तृतियांश पदे पदवीधारांसाठी असतील. जगभरात होणाऱ्या या भरतीत टेक्निकल, मॅन्यफॅक्चरिंग सोबत कंपनीच्या नव्या एनर्जी, सायबर आणि डिजीटल सारख्या दीर्घकालीन व्हिजनला सपोर्ट देणाऱ्या नवीन कौशल्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट सुरु आहे. आर्थिक मंदीच्या धास्तीने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामावरुन काढून टाकले जात आहे. ॲमेझॉन, फेसबुक, ट्विटर, IBM, SAP आणि अन्य अनेक कंपन्यांनी यावर्षी सुमारे ६७,२६८ लोकांना नोकरीवरुन कमी केले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news