YCM Hospital Server Down: वायसीएम रुग्णालयात सर्व्हर डाऊन; औषध वितरण ठप्प, रुग्णांना तासभर प्रतीक्षा

ओपीडी सुरू झाल्यानंतरही औषधे मिळेनात; तांत्रिक बिघाडामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मनस्ताप
YCM Hospital Server Down
YCM Hospital Server DownPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) औषध वितरण विभागाचे कामकाज सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ठप्प झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. ओपीडी सुरू झाल्यापासून औषधे घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना औषध वितरण विभागासमोर ताटकळत उभे राहावे लागले. सुमारे एक तास उलटूनही औषधे मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

YCM Hospital Server Down
Indrayani River Cleaning: देहूतील इंद्रायणी नदीपात्रात राडारोड्याचे साम्राज्य; स्वच्छता आणि संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना डॉक्टरांकडून तपासणी झाल्यानंतर औषधे घेण्यासाठी औषध वितरण विभागात जावे लागते. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत औषध वितरणाचे कामकाज थांबल्याने औषधे मिळवण्यासाठी रुग्णांना लांब रांगेत उभे राहावे लागले.

YCM Hospital Server Down
Ranganubhuti Theatre Festival: कलाकारांचा आत्मा एकच; ‘रंगानुभूति’ नाट्य महोत्सवात प्रयोगकर्मींचा सन्मान

आधीच आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना औषधांसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे, ही गंभीर बाब आहे. वायसीएम रुग्णालय हे पिंपरी-चिंचवडसह परिसरातील अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक रुग्णालय आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येतात.

YCM Hospital Server Down
Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना नागरिकांची पसंती; सुकन्या, पीपीएफसह ज्येष्ठ नागरिक योजनेला प्रतिसाद

अशा रुग्णालयातील औषध वितरण व्यवस्था तांत्रिक अडचणीमुळे ठप्प झाल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो. सर्व्हरच्या समस्येमुळे कामकाज थांबणार असेल, तर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.

YCM Hospital Server Down
Pimpri Chinchwad River Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये ६०० एमएलडी सांडपाणी थेट नदीत; कोट्यवधींचे एसटीपी ठरले शोभेचे!

सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून औषध वितरण सुरळीत करावे, तसेच तांत्रिक अडचणीच्या काळात रुग्णांना औषधे मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारावी, अशी मागणी रुग्ण आणि नागरिकांकडून होत आहे. रुग्णसेवा ही केवळ सुविधा नसून प्रशासनाची जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.