Indrayani River Cleaning: देहूतील इंद्रायणी नदीपात्रात राडारोड्याचे साम्राज्य; स्वच्छता आणि संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर

पूल, घाट आणि जलवाहिनीच्या कामानंतरही दगडगोटे, माती व बांधकामाचा कचरा कायम; नदीपात्राची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी
Indrayani River Pollution
Indrayani River PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

देहूगाव: तीर्थक्षेत्र देहू येथे कार्तिकी एकादशी यात्रेची सांगता झाल्यानंतर आता इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा आणि संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात साचलेला राडारोडा, माती, गाळ आणि अनावश्यक कचऱ्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत. विकासकामे पूर्ण होऊनही नदीपात्रातील राडारोडा पूर्णपणे हटविण्यात आलेला नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Indrayani River Pollution
Ranganubhuti Theatre Festival: कलाकारांचा आत्मा एकच; ‘रंगानुभूति’ नाट्य महोत्सवात प्रयोगकर्मींचा सन्मान

तीर्थक्षेत्र देहूचा विकास करताना इंद्रायणी नदीवर तीन पूल उभारण्यात आले. नदीकिनारी विविध घाटांची बांधणी करण्यात आली. तसेच, भामा आसखेड धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला नेण्यासाठी नदीपात्रातून जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, या विकासकामांच्या वेळी नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडगोटे, माती आणि बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला. कामे पूर्ण झाल्यानंतरही हा राडारोडा पूर्णपणे हटविण्यात न आल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Indrayani River Pollution
Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना नागरिकांची पसंती; सुकन्या, पीपीएफसह ज्येष्ठ नागरिक योजनेला प्रतिसाद

ठोस उपाययोजना करण्याची मागणी

नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून पूल, घाट आणि जलवाहिनीच्या कामांमुळे साचलेला राडारोडा हटवावा, शास्त्रीय पद्धतीने नदीपात्राची स्वच्छता व गाळ काढून आवश्यक त्या ठिकाणी खोली आणि रूंदी वाढवावी. तसेच, पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री आराखडे तयार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Indrayani River Pollution
Pimpri Chinchwad River Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये ६०० एमएलडी सांडपाणी थेट नदीत; कोट्यवधींचे एसटीपी ठरले शोभेचे!

जलसाठ्यावर परिणाम

नदीपात्रातील राडारोड्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीपात्राची खोली कमी होऊन पाणी वाहून नेण्याची क्षमता बाधित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, गाळ आणि जलपर्णीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाण्याच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होत आहे. याचा परिसरातील भूजल पातळीवरही विपरीत परिणाम होत असून, अनेक नागरिकांच्या बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाला आहे. काही ठिकाणी पाणी संपुष्टात येत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.

Indrayani River Pollution
Pimpri News: दुष्काळामुळे आता बांधकामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे सक्तीचे; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन धोरण

तीर्थक्षेत्राच्या पावित्र्याशी जोडलेली नदी

देहूची इंद्रायणी नदी ही देहू, खेड आणि मावळ तालुक्यांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. अनेक भाविक इंद्रायणी नदीतील पाणी तीर्थ मानून श्रद्धेने प्राशन करतात. संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देहूभूमी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही वारकरी संप्रदायाची प्रमुख श्रद्धास्थाने आहेत. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना इंद्रायणी नदीने जोडले आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक अस्तित्व जपणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.