Ranganubhuti Theatre Festival: कलाकारांचा आत्मा एकच; ‘रंगानुभूति’ नाट्य महोत्सवात प्रयोगकर्मींचा सन्मान

पिंपरी-चिंचवडमध्ये चार दिवस रंगला नाट्य महोत्सव; महाराष्ट्रातील प्रायोगिक नाट्य चळवळीतील संस्थांचा गौरव, विविध भाषांतील नाटकांची मेजवानी
Ranganubhuti Theatre Festival
Ranganubhuti Theatre FestivalPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: नाट्य महोत्सवाच्यानिमित्ताने एखाद्या वारी किंवा जत्रेप्रमाणे कलाकार ठिकठिकाणी कला सादरीकरणासाठी फिरत असतो. आम्ही सगळे कलाकार कोणत्या नात्याने एकमेकांशी जोडले आहोत हा विचार आला की, उत्तर मिळते ते म्हणजे आम्हा कलाकारांचा आत्मा एक आहे, असे वक्तव्य भारतीय चित्रपट डिव्हिजनचे माजी विभागप्रमुख समर नखाते यांनी केले. रंगानुभूति :पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी ते गदिमा नाट्यगृह निगडी येथे बोलत होते.

Ranganubhuti Theatre Festival
Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना नागरिकांची पसंती; सुकन्या, पीपीएफसह ज्येष्ठ नागरिक योजनेला प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सवाचे आयोजन प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगतेवेळी कलाकार आणि महाराष्ट्रातील प्रायोगिक नाट्य चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या संस्थांचा प्रयोगकला सन्मानाने गौरव करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

Ranganubhuti Theatre Festival
Pimpri Chinchwad River Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये ६०० एमएलडी सांडपाणी थेट नदीत; कोट्यवधींचे एसटीपी ठरले शोभेचे!

नखाते म्हणाले, की जगभरात कलेच्या नात्याने या मंडळींची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे. हे नातं आम्हाला जगवायचं आहे त्यासाठी रंगमंच साथ देतो. महोत्सवामुळे कलाकार एकमेकांशी जोडले जात असून, प्रेक्षकांना उत्तम कलाकृतींचा आस्वाद मिळतो. नाट्य प्रयोगकला महोत्सवाला सर्वांची साथ गरजेची आहे. रंगानुभूति महोत्सवाला पिंपरी-चिंचवड महापालिकेची साथ मिळते आहे, हे कौतुकास्पद आहे.

Ranganubhuti Theatre Festival
Pimpri News: दुष्काळामुळे आता बांधकामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे सक्तीचे; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन धोरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे म्हणाले, की नाट्य प्रयोगकला महोत्सव ही अशी जागा आहे, जिथे समान काम करणारे रंगकर्मी एकत्र येतात. एरवी पाहाता येणार नाही अशा नाटकांचे भारतभरातील प्रयोग आपल्याला नाट्य महोत्सवांत पाहायला मिळतात. महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाषेतील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होते.

Ranganubhuti Theatre Festival
Migrant workers children education: कामगार मुलांच्या शिक्षणाला स्थलांतराचा ब्रेक

प्रायोगिक नाट्य चळवळ अधिक वृद्धींगत करणाऱ्या महाष्ट्रातील संस्थांना प्रयोगकला सन्मानाने या वेळी गाैरविण्यात आले. यात उत्कर्ष कलाविष्कार, (भुसावळ), अग्नीमित्र (पुणे), संवाद (सातारा), चिंचवड मल्याळम समाज (चिंचवड), महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे) या संस्थांचा समावेश होता. आसाममधील बाडुनगडुप्पा संस्थेचे रंगकर्मी मदन राभा, निलोत्पल बरुआ यांच्या कार्यशाळा आणि सादरीकरणासाठी विशेष सन्मान देण्यात आला. पिंपरी-चिंचवडच्या चित्रकारांकडून शेती करणारी महिला, निसर्ग या विषयांवरील चित्रे प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. यासाठी विशेष योगदान असलेल्या संस्कार भारती संस्थेचादेखील सन्मान करण्यात आला.

नाटकाचे सादरीकरण

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात फिजिकल थिएटर विषयीची कार्यशाळा राष्ट्रीय नाट्य विद्यालयात स्टेज मॅनेजर असलेल्या अभिषेक मुद्गल यांनी घेतली. दुसऱ्या सत्रात 'एबॉन्ग आमरा' या पश्चिम बंगाल येथील संस्थेने 'राधा कृष्ण' हे अतिशय सुंदर नाटक सादर केले. सन्मान सोहळ्यानंतर 'तमाशा थिएटर' यांचे 'ओट्टम बोर्न टु रन' हे नाटक सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.