Wadgaon Maval Sports Complex: वडगाव मावळच्या क्रीडासंकुलासाठी पोटोबा देवस्थानची जागा द्या; राजकारण न करण्याचे आवाहन

उपनगराध्यक्ष सुनील ढोरे आक्रमक; ‘पुढारी’च्या वृत्तानंतर क्रीडासंकुलाच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Wadgaon Maval Nagar Panchayat
Wadgaon Maval Nagar PanchayatPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: येथील प्रस्तावित क्रीडासंकुलसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप करत यामध्ये कुठलेही राजकारण करू नये. तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानने क्रीडा पंढरी म्हणून ओळख असलेल्या गावच्या सार्वजनिक हितासाठी जागा देण्यास मान्यता द्यावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

Wadgaon Maval Nagar Panchayat
Pimpri Chinchwad Dhol Tasha: गणेशोत्सवाची चाहूल; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांच्या मागणीला जोर

नगरपंचायत सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, अजय भवार, नगरसेविका माया चव्हाण, सुनी­­­ता ढोरे, पूनम भोसले, वैशाली सोनवणे उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सुनील ढोरे म्हणाले, की वडगाव शहर हे वेटलिफ्टिंगची पंढरी म्हणून ओळखली जाते. शहरामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी क्रीडा संकुल होणे ही अभिमानाची व अत्यावश्यक बाब आहे. देवस्थानचे तत्कालीन मुख्य विश्वस्त स्व. सोपानराव म्हाळसकर यांनीही देवस्थानच्या जागेमध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी किंवा क्रीडा संकुलसाठी जागा आरक्षित करण्यासाठी त्यांनी संमती दर्शवली होती; परंतु आज तालुकास्तरीय भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा आवश्यक असताना देवस्थान विश्वस्त मंडळ मात्र जागा देण्यास स्पष्ट नकार देत असून, यामध्ये काहीतरी राजकारण होत असल्याचा आरोपही ढोरे यांनी केला आहे.

Wadgaon Maval Nagar Panchayat
Pimpri Chinchwad Chain Snatching: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ चेनचोरींचा पर्दाफाश; ४०० ते ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मुंबईपर्यंत ट्रेस

या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहारात देवस्थानच्या जागा न्यायप्रविष्ट असून, नगरपंचायत विकास आराखड्यामध्ये देवस्थानच्या जागेवर टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे सद्यस्थितीत जागा देण्यास देवस्थानचा विरोध आहे, असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी नगरपंचायत प्रशासनाला कळवले आहे.

Wadgaon Maval Nagar Panchayat
Chakan MIDC Fire: चाकण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

देवस्थानची जागा गावाच्या सार्वजनिक हितासाठी द्या

वास्तविक देवस्थानच्या जमिनीबाबत सुरू असलेल्या विविध दाव्यातील व्यक्तींसोबत चर्चेने मार्ग सुटू शकतो. तसेच, नगरपंचायत विकास आराखड्यात फक्त संबंधित एकाच जागेवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षण टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे ही कारणे मोघम असून, यामध्ये केवळ राजकारणच होत असल्याचा आरोप सुनील ढोरे यांनी केला व कुठलीही राजकारण न करता देवस्थानची जागा गावाच्या सार्वजनिक हितासाठी द्यावी, असे आवाहन केले. नगरसेवक पंढरीनाथ ढोरे म्हणाले, की देवस्थानच्या जागेत मेडिकल कॉलेज, क्रीडांगण, रुग्णालय, भक्तनिवास व्हावेत, अशी स्व. सोपानराव म्हाळसकर यांची इच्छा होती. तसेच, क्रीडासंकुल म्हणजे तालुक्याच्या व वडगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळांनी विरोध न करता जागा देण्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Wadgaon Maval Nagar Panchayat
PCMC Schools Sports Facilities: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २२ शाळांना मैदानच नाही; ४५ हजार विद्यार्थ्यांसाठी फक्त १२ क्रीडा शिक्षक

दैनिक ‘पुढारी’च्या वृत्तानंतर हालचालींना वेग

दैनिक ‘पुढारी’ने १ सप्टेंबर रोजी क्रीडा संकुल उभारणार; पण पोटोबा देवस्थान जागा देणार का? यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर नगरपंचायतने देवस्थान विश्वस्त मंडळासह सात सप्टेंबर रोजी संयुक्त बैठक आयोजित केली; परंतु देवस्थानच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी नगरपंचायत प्रशासनाला पत्र पाठवून जागा देण्यास विरोध असल्याचे लेखी कळवले. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान, यापूर्वी नगरपंचायत व देवस्थान प्रतिनिधींमध्ये तोंडी चर्चा सुरू होती. दैनिक ‘पुढारी’चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हालचालींना वेग आल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news