Pimpri Chinchwad Dhol Tasha: गणेशोत्सवाची चाहूल; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांच्या मागणीला जोर

मिरवणुकांसाठी वाद्यांची वाढती मागणी; ढोलांना कातडी चढविणे, रस्सी बांधणे आणि ताशांची ट्युनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर
Dhol Tasha
Dhol TashaPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशाशिवाय शोभा नाही. गणेशोत्सवाच्या दोन महिनेआधीच ढोल-ताशा पथकांच्या वादनाला सुरुवात होत असते. आता उत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये सादरीकरणास ढोल-ताशांची मागणी वाढली आहे. कारागीरांकडून ढोल-ताशांच्या बांधणीला वेग आला आहे.

Dhol Tasha
Pimpri Chinchwad Chain Snatching: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ चेनचोरींचा पर्दाफाश; ४०० ते ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मुंबईपर्यंत ट्रेस

पिंपरी-चिंचवड शहरात ढोल-ताशा बनवणारे कारागिर सध्या ढोल-ताशा बांधणीत व्यस्त झाल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल-पथकांची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ढोल-ताशाच्या साहित्याचीही मागणी वाढली आहे.

Dhol Tasha
Chakan MIDC Fire: चाकण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

पुण्यातील बाजारपेठांत ढोल-ताशा विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड मध्येही असलेल्या दुकानांत यंदा ढोल-ताशांची मागणी जोरावर आहे. पिंपरी चिंचवड भागांतदेखील मोठ्या प्रमाणात ढोलताशा पथक आहेत. त्यामुळे या पथकांना लागणारे ढोल-ताशा शहरातच मिळत आहेत.

Dhol Tasha
PCMC Schools Sports Facilities: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २२ शाळांना मैदानच नाही; ४५ हजार विद्यार्थ्यांसाठी फक्त १२ क्रीडा शिक्षक

ढोल, ताशा आणि इतर साहित्याचीही यंदा मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, त्यामुळे व्यावसायिकही खूश आहेत. येणार्‍या ऑर्डर पूर्ण करण्यात कारागीर व्यस्त आहेत. ढोलांना कातडी चढविणे, रस्सी बांधणे, ताशांची ट्युनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Dhol Tasha
Pimpri Chinchwad Water Supply: पिंपरी-चिंचवडची पाण्याची चिंता मिटणार? ठोकरवाडी धरणातून ६०० एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन

चामड्याचे अन् फायबरचे ढोल

दर वेळी थोडेफार किंमतीत बदल होत असतात. चामड्याचे ढोल आकारानुसार 3००० हजार ते ४००० हजारपर्यंत उपलब्ध आहेत. तर फायबर चे २६०० रुपयांना उपलब्ध आहे. तर ताशामध्ये पितळी ताशा ८५०० रुपये आणि स्टिलचे १५०० रुपयांपर्यंत मिळतात. शहरात ढोल ताशा पथके मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे अजूनही ऑर्डर सुरू आहेत. तसेच दुरुस्तीसाठीदेखील वाद्य येतात. यावर्षी एकंदर चांगली मागणी आहे, असे कारागीराने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news