Pimpri Vegetable Market Prices: आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले; मिरची, भेंडी, बिन्स स्वस्त

दिवाळीपूर्वी बाजारात मोठ्या प्रमाणात आवक; पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर घसरले, गवार मात्र महागच
Vegetable prices increase
आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले; मिरची, भेंडी, बिन्स स्वस्तPudhari news network
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 19) रोजी दिवाळीमुळे पालेभाजी तसेच फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर उतरले होते. मिरची, भेंडी, बिन्स 50 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. तर गवार भाजीचा दर 200 रुपये किलो झाला आहे. पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत.(Latest Pimpri chinchwad News)

Vegetable prices increase
Late MLA Shivaji Kardile Tribute: जेऊर गाव बंद ठेवून स्व. आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली

फळभाज्यांमध्ये गवार, वाटाणा, शेवगा यांच्या दरात वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर उतरले आहेत. बाजारात शेवगा आणि वाटाणा 150 रुपये किलो होता. तोंडल्याचे दरदेखील कमी झाले आहेत.

कोथिंबीरची जुडी 20 ते 30 रुपये तर इतर पालेभाज्या 15 ते 20 रुपये जुडी विक्री केली जात आहे.तर फळ भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो यांचे दर स्थिर आहेत.

Vegetable prices increase
Prakash Chitte joins Shinde Sena: भाजपचे प्रकाश चित्ते शिवसेनेत दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भगवा झेंडा प्रदान

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे

रविवारी बाजारात गवार 180 रुपये किलो, शेवगा 90 रुपये किलो होता. वाटाणा 150 रुपये किलो, टोमॅटो 30 रुपये, भेंडी 60 रुपये किलो, फ्लॉवर 60, कोबी 30, मिरची 80, गाजर 70, शिमला 80, लसूण 100, आले 80, वांगी 80, काकडी 30, कारले 60, कांदे 100 रुपयांणा पाच किलो, बटाटा 25 रुपये किलो, बिन्स 80, पावटा 80, लाल भोपळा 60, घोसाळी 60, दोडका 80, तोंडली 80, बीट 40, दुधी भोपळा 50, घेवडा 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable prices increase
Diwali shopping rush Ahmednagar: बाजारात दिवाळीची धामधूम; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, कोट्यवधींची उलाढाल

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 20 रुपये, मेथी 40, पालक 20, शेपू 25, राजगिरा 25, पुदिना 10, मुळा 30, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 25 रुपये जुडी, आंबट चुका 25, गवती चहा 10 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable prices increase
Caste Verification: जातपडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांवर अन्याय

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

डबल बी 140 रुपये, गवार 200, तोंडली 80, वाटाणा 160, बीट 70, वाल 90, दोडका 90, कारली 80, भरताची वांगी 60, शेवगा 150, भेंडी 80, मिरची 90, फ्लॉवर 40, कोबी 40, वांगी 60, तोंडली 120, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 80, परवल 80, सुरण 80, मद्रास काकडी 60, सिमला मिरची 90 रुपये, राजमा 80, बिन्स 90, गाजर 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable prices increase
Nitrazepam Illegal Sale: श्रीरामपूर बस स्टॅण्डवर रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 6, बटाटा 12, आले 45, लसूण 0, भेंडी 35, गवार 90 , टोमॅटो 15, वाटाणा 100, घेवडा 50, दोडका 40, हिरवी मिरची 25, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 35, गाजर 12, फ्लॉवर 15, कोबी 10, वांगी 45, ढोबळी 50, तोंडली 45, बीट 25, शेवगा 100, घोसाळी 35, मका कणीस 20 रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 3132 पालेभाजी 42800 (गड्डी), फळे आवक 521, कांदा 650 बटाटा 325, आले 54, लसूण 0, भेंडी 91, गवार 9, टोमॅटो 608, वाटाणा 32, घेवडा 55, दोडका 53, हिरवी मिरची 134, दुधी भोपळा 62, काकडी 157, कारली 57, डांगर 45, गाजर 83, फ्लॉवर 232, कोबी 189, वांगी 83, ढोबळी 40, बीट 10, शेवगा 17, लिंबू 80, मका कणीस 144, तोंडली 10, रताळी 2 क्विंटल अशी आवक झाली.

Vegetable prices increase
Dowry Harassment: श्रीरामपूरात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल; पैशासाठी विवाहितेचा छळ

मद्रासी केळी, सीताफळाची आवक

पिंपरी फळ बाजारात सीताफळ आणि पांढरे ड्रॅगन फुटची आवक झाली असून भाव देखील आवाक्यात आहेत. सीताफळ आणि ड्रॅगन फुट 100 रुपये किलो दराने उपलब्ध होते. छोट्या आकाराची मद्रासी केळी 140 रुपये किलो दराने उपलब्ध होती.

जळगाव केळी 50 - 60 रुपये डझन दराने उपलब्ध आहेत. सफरचंद 100 रुपये किलो दराने तर डाळींब 160 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. ड्रॅगनफ्रुट 100 - 150 रुपये किलो, पपई 60 रुपये किलो दराने आहेत. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. वाढत्या तापमानामुळे सध्या फळांना मागणी वाढत आहे.

Vegetable prices increase
Relief Fund: दिवाळीपूर्वीच ८ लाख शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! ८४६ कोटींची थेट मदत खात्यात

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे

चिकू 100 - 160 रुपये, सफरचंद 140, तर मोसंबी 100 - 180, नागपूर संत्री 100, सीताफळ 100 रूपये, डाळिंब 160 - 200 रुपये, पेरू 100, पपई 60 - 70, केळी 50 - 60 रुपये डझन, पिअर 140, , ड्रॅगनफ्रुट पांढरे 100 रुपये दीड किलो, किवी 120, नाश्पती 120 रुपये, आलुबुखार 150 रुपये, अननस 120 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news