Nitrazepam Illegal Sale: श्रीरामपूर बस स्टॅण्डवर रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक

भुसावळचा काल्या उर्फ तस्लीम सलीम शेख विना परवाना नायट्राझेपम गोळ्या विकत, २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक
रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवकPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: विना परवाना अवैधरित्या गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळया विकणाऱ्या भुसावळ येथील एका तरुणास श्रीरामपूर बस स्टॅण्डवर पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून 24 हजार 26 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख (रा. भुसावळ, जिल्हा, जळगाव) असे त्याचे नाव आहे.  (Latest Ahilyanagar News)

रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक
Dowry Harassment: श्रीरामपूरात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल; पैशासाठी विवाहितेचा छळ

श्रीरामपूर बस स्टॅण्ड परिसरातील वॉर्ड नं.5 येथे एक संशयीत इसम गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आला आहे, अशी गुप्त खबर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. तत्काळ पोलिस पथकाने बस स्टॅण्ड परिसरात संशयीत इसमाचा शोध घेतला. बस स्टॅण्डच्या भिंतीच्या आडोशाला शौचालयासमोर एक इसम संशयीतरित्या कापडी पिशवी हातामध्ये घेवून, फिरताना आढळला.

रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक
Relief Fund: दिवाळीपूर्वीच ८ लाख शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! ८४६ कोटींची थेट मदत खात्यात

व्यक्तीस ताब्यात घेतले. काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख (रा. भुसावळ) असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. ‌‘पिशवीमध्ये काय आहे,‌’ असे पोलिसांनी विचारले असता, ‌‘गुंगीकारक नशा आणणाऱ्या ‌‘नायट्राझेपम गोळ्या‌’ आहेत. त्या मी विक्रीसाठी येथे आणल्या आहेत,‌’ असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यांच्या कडून 1 हजार 26 रुपये किमतीच्या नायट्राझेप गोळ्यांची 19 पाकिटे व 23 हजार रोकड असा एकूण 24 हजार 26 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रंगेहात पकडले नायट्राझेपम विकणारे युवक
Hospital Jewellery Theft: खासगी हॉस्पिटलमधून उपचार घेत असलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी!

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र शिखरे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news