Dowry Harassment: श्रीरामपूरात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल; पैशासाठी विवाहितेचा छळ

‘२ लाख रुपये आण’ अशी मागणी; पतीसह नातलगांकडून शारीरिक व मानसिक त्रास, विवाहितेची तक्रार पोलिसांकडे
Dowry Harassment
पैशासाठी विवाहितेचा छळPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूरः पैशाची सतत मागणी करीत विवाहित महिलेचा सासरी अहिल्यानगर येथे छळ करण्यात आला आहे. शबनम शाहरूख शेख असे विवाहितेचे नाव आहे. श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. 2, बजरंग चौकात तिचे माहेर आहे. शबनम शेख हिचा विवाह अहिल्यानगर येथील शाहरूख शेख याच्याशी (दि. जून 2024) रोजी करण्यात आला. लग्नात 1 लाख रूपये हुंडा, सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट दिले होते. (Latest Ahilyanagar News)

Dowry Harassment
Relief Fund: दिवाळीपूर्वीच ८ लाख शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! ८४६ कोटींची थेट मदत खात्यात

सासरच्या लोकांनी तिला 15 दिवस चांगले नांदवले. यानंतर, ‌‘लग्नात हुंडा कमी दिला, आणखी 2 लाख रूपये घेवून ये,‌’ अशी मागणी करीत तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. ‌‘तू मला पसंत नाही. मला दुसरा निकाह करायचा आहे,‌’ असे म्हणत पती तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. ‌‘मला दुसरे लग्न करायचे आहे. ते लोक मला 10 लाख रूपये देणार आहेत,‌’ असे सतत सांगितले जात होते. ‌‘तलाक दे‌’ असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

Dowry Harassment
Hospital Jewellery Theft: खासगी हॉस्पिटलमधून उपचार घेत असलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी!

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शबनम शाहरूख शेख यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाहरूख शेख, राबीया शेख, फातेमा शेख, राजू शेख, मोईन शेख, अरफात शेख, रेहान शेख, राजमीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news