Vallabhnagar Badminton Hall: आरोग्यासाठी येतात, पण अस्वच्छतेचा सामना! वल्लभनगर बॅडमिंटन हॉल परिसरात भंगाराचा खच

वाढलेली झाडी, साचलेला पालापाचोळा आणि पावसात भिजणाऱ्या वस्तूंमुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता; स्वच्छतेची मागणी
Vallabhnagar Badminton Hall Issue
Vallabhnagar Badminton Hall IssuePudhari
Published on
Updated on

वल्लभनगर: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वल्लभनगर येथील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉलमध्ये दररोज क्रीडाप्रेमी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. आरोग्य आणि फिटनेससाठी नागरिक ज्या ठिकाणी येतात त्याच हॉलच्या बाहेरील परिसरात मात्र अस्वच्छता, वाढलेली झाडी आणि भंगार साहित्यांचा खच पडल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे हे साहित्य भिजत असल्याने डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Vallabhnagar Badminton Hall Issue
Pimpri Chinchwad Scholarship Result 2026: पिंपरी-चिंचवडच्या २३४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत निवड; चौथीचे १३१, सातवीचे १०३ विद्यार्थी

परिसरात गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी खुर्च्या, लोखंडी कटआउटचे सांगाडे, खराब व फाटलेले फ्लेक्स, जुने फर्निचर, मोठंमोठे प्लायवूडचे तुकडे, पुठ्ठ्याचे बॉक्स, खराब दरवाजा आणि पाण्याची रिकामी टाकी अस्ताव्यस्त पडलेली आहे. याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून, पालापाचोळा साचला आहे. पावसामुळे भंगार साहित्य व इतर वस्तूंमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता करण्याची गरज आहे.

Vallabhnagar Badminton Hall Issue
PCMC School Teacher Shortage: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा; विद्यार्थ्यांची उपस्थिती ८५ वरून ६० टक्क्यांवर

आरोग्यासाठी येणाऱ्यांनाच करावा लागतोय अस्वच्छतेचा सामना

धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूकता वाढल्याने बॅडमिंटन खेळाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या हॉलमध्ये सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होते. तरुणांसोबतच महिला आणि ज्येष्ठ नागरिकही नियमितपणे येथे सरावासाठी येतात. आयटी आणि एमआयडीसीमध्ये काम करणारे कर्मचारीही दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी आणि फिटनेस टिकवण्यासाठी या सुविधेचा लाभ घेत आहेत. मात्र एकीकडे नागरिकांना क्रीडा आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात असताना दुसरीकडे त्याच परिसरात कचरा व भंगार साहित्य पडून राहणे हा विरोधाभास असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आधार केंद्रामुळे नागरिकांचीही वर्दळ

हॉल परिसरातील आधार केंद्रात विविध कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे क्रीडाप्रेमींसोबतच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकही या परिसरात ये-जा करतात. अशा ठिकाणी वाढलेली झाडी साचलेला पालापाचोळा आणि पावसात भिजणारे साहित्य यामुळे आरोग्याच्यादृष्टीने प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

Vallabhnagar Badminton Hall Issue
PCMC Logo Changes: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोधचिन्हात बदल; शिवरायांची अश्वारूढ प्रतिमा, ‘कटिबद्धा जनहिताय’ अधिक ठळक

भंगार हटवून नियमित स्वच्छतेची मागणी

महापालिकेने हॉल परिसरातील वाढलेली झाडी व पालापाचोळा तातडीने साफ करावा, निरुपयोगी भंगार साहित्य हटवावे, पाणी साचणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावावी आणि आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व क्रीडाप्रेमींकडून होत आहे. क्रीडाप्रेमींच्या आरोग्यासाठी उभारलेल्या क्रीडा केंद्राचा परिसरही स्वच्छ आणि आरोग्यदायी असणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या समस्येकडे कधी गांभीर्याने पाहणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हा हॉल नागरिकांसाठी उपयोगी ठरावा यासाठी तो बंद ठेवण्यापेक्षा खुला करणे गरजेचे आहे. आम्ही येथे नियमितपणे खेळतो. त्यामुळे नागरिकांसोबतच महिला वर्गासाठी योगासने आणि इतर उपक्रमांसाठी हॉलचा वापर व्हायला हवा. हॉलमध्ये गळती होत असेल तर ती तातडीने दुरुस्त करून भिजलेल्या फळ्या आणि खराब साहित्य हटवावे. तसेच, भविष्यात लिकेज होणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉलच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, परिसर स्वच्छ ठेवावा. सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, व्यायाम शाळा आणि उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची नियमितगस्त घालण्याच्या मागणीचे पत्र पोलिस ठाण्याला दिले आहे.

योगेश बहल, नगरसेवक वल्लभनगर

Vallabhnagar Badminton Hall Issue
Pimpri Chinchwad Road Potholes: पिंपरी-चिंचवडमध्ये खड्डे बुजवण्यासाठी १५० कोटींची तरतूद; तरी १९५ किलोमीटरचे रस्ते खराब

परिसराची पाहणी उद्या करण्यात येईल. जेथे रिकाम्या टाक्या पडून असतील तर त्या तातडीने उचलण्यात येतील. तसेच, परिसराची स्वच्छता करून आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.

नितीन तुपे, आरोग्य निरीक्षक, ह क्षेत्रीय कार्यालय

वल्लभनगर येथील बॅडमिंटन हॉल व परिसराची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.

अभय कुलकर्णी, ल क्षेत्रीय कार्यालय, उपअभियंता स्थापत्य, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news