

पिंपरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फ़त एप्रिल २०२६ रोजी घेतल्या गेलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृती परीक्षेचा निकाल लागला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता चौथीचे १३१ विद्यार्थी व इयत्ता सातवीचे १०३ विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. महापालिकेच्या शाळांतील १८ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
शहरातील चौथीचे ८१९९ पैकी २७९६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता ४ थीचा निकाल ३०.४५ टक्के लागला आहे. तर, ७ वीचे ५४९० पैकी २०३४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता ७ वीचा निकाल ४१.६७ टक्के लागला आहे. इयत्ता चौथीत ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचा शिवोहम पवार हा विद्यार्थी ९२.६६ टक्के गुण मिळवून शहरात सर्वप्रथम आला आहे.
इयत्ता ७ वीत एच. ए. हायस्कूलचा प्रीत पाटील हा विद्यार्थी ९२.६१ टक्के गुण मिळवून शहरात प्रथम आला आहे. इयत्ता चौथीत महात्मा फुले विद्यालय, भोसरीचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे ७ वीचे २० विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. गुणवत्ता यादीत आलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याला वार्षिक ५ हजार रुपये तर ७ वीच्या विद्यार्थ्याला वार्षिक ७५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
इयत्ता चौथीचे विद्यार्थी
माऊली शिंदे (८८ टक्के) चऱ्होली प्राथमिक शाळा
अनुष्का भोरे (८६ टक्के) जाधववाडी कन्या प्राथ. शाळा
सक्षम चव्हाण (७८. ५२ टक्के) कै. दत्तोबा काळे इंग्लिश शाळा
सृष्टी पठारे (७८ टक्के ) चऱ्होली प्राथमिक शाळा
देवांशी थोरे (७६.६६ टक्के ) म्हेत्रेवाड़ी प्राथमिक शाळा क्रमांक ९२
नवनाथ नरवडे (७५.३३ टक्के) डुडुळगांव प्राथमिक शाळा
स्वरा धमाळ (७५.३३ टक्के) पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४/१
श्रेयांशी शिंदे (७५.३३ टक्के) नेवाळेवस्ती प्राथमिक शाळा क्रमांक ८८
आयुष थोरात (७४.६६ टक्के) चऱ्होली प्राथमिक शाळा
अहेम वर्मा (७४ टक्के) कुदळवाड़ी प्राथमिक शाळा क्रमांक ८९
श्रीजीत सुर्वे (७३.३३) मोशी मुले प्राथमिक शाळा
इयत्ता सातवीचे यशस्वी विद्यार्थी
सृष्टी केरकट्टा (८६.६६ टक्के) दिघी कन्या प्राथमिक शाळा
सुप्रिया गोल्हार (८४ टक्के) जाधववाडी कन्या प्राथमिक शाळा
शुभ्रा ढाणे (८३.३३ टक्के) जाधववाडी कन्या प्राथमिक शाळा
दीक्षा पाईकराव (८२.६६ टक्के) दिघी कन्या प्राथमिक शाळा
प्रणव बोराड़े (७६.६६ टक्के) मोशी मुले प्राथमिक शाळा
तुषार तोक्ते (७६ टक्के) मोशी मुले प्राथमिक शाळा.
मयूरी जऱ्हाड (७४ टक्के) दिघी कन्या प्राथमिक शाळा