PCMC Logo Changes: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोधचिन्हात बदल; शिवरायांची अश्वारूढ प्रतिमा, ‘कटिबद्धा जनहिताय’ अधिक ठळक

स्थायी समितीची उपसूचनेद्वारे मंजुरी; आयुक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर महापालिका भवनासह सर्व कार्यालयांत नवे बोधचिन्ह
PCMC Logo Changes
PCMC Logo ChangesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात स्थायी समितीने छोटे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, या बोधचिन्हामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेचे तसेच ‘कटिबद्धा जनहिताय’ हे प्रेरणादायी ब्रीदवाक्य अधिक स्पष्टपणे व ठळक दिसत आहे. हे बोधचिन्ह कांस्यधातूमध्ये बनवल्याचा भास होत आहे. बोधचिन्हातील बदलास स्थायी समितने उपसूचनेद्वारे मंजुरी दिली आहे.

PCMC Logo Changes
Pimpri Chinchwad Road Potholes: पिंपरी-चिंचवडमध्ये खड्डे बुजवण्यासाठी १५० कोटींची तरतूद; तरी १९५ किलोमीटरचे रस्ते खराब

महापालिकेचे सध्याचे बोधचिन्ह हे स्केच काढल्याप्रमाणे आहे. त्या बोधचिन्हात बदल करून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा अधिक ठळकपणे जाणवत आहे; तसेच महापालिकेच्या वतीने जनहिताची कामे करताना हे बोधचिन्ह व त्यावरील ‘कटिबद्धा जनहिताय’ हा संदेश प्रशासकीय व सामाजिक बांधिलकीची साक्ष देणार आहे.

PCMC Logo Changes
Moshi Garbage Depot Buffer Zone: मोशी कचरा डेपोच्या बफर झोनमध्ये बिनधास्त प्लॉटिंग; अनधिकृत बांधकामांनी सुरक्षेला धोका

बोधचिन्ह कांस्यधातून तयार झाल्याचा आभास निर्माण करत आहे. हे नवीन बोधचिन्ह महापालिका भवन, सर्व दहा क्षेत्रीय कार्यालय तसेच, विविध विभागांच्या इमारतींच्या दर्शनी ठिकाणी लावण्यात येणार आहे. नव्या रचनेतील बोधचिन्हास स्थायी समितीने उपसूचनेद्वारे मंजुरी दिली आहे. दरम्यान, समितीच्या उपसूचनेनुसार नव्या बोधचिन्हास आयुक्तांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news