Vegetable prices pune market: आवक घटली, पालेभाज्यांचे दर वधारले! कोबी-फ्लॉवर मात्र स्वस्त

गवार-वटाणा 150 रुपये किलोवर; कोथिंबीर, पालकाच्या जड्या 30 रुपयांवर
Vegetable prices pune market
आवक घटली, पालेभाज्यांचे दर वधारले! कोबी-फ्लॉवर मात्र स्वस्तPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 5) रोजी भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांची आवक घटली होती. त्यामुळे पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. कोथिंबीर, मेथी, पालक या पालेभाज्यांचे दर साधारण 10 रुपयांनी वाढले आहेत. तर फळभाज्यांमध्ये गवार, वाटाणा, शेवगा यांच्या दरात वाढ झाली असून कोबी व फ्लॉवर यांचे दर कमी झाले आहेत. (Latest Pimpri chinchwad News)

बाजारात शेवगा आणि वाटाणा 150 रुपये किलो होता. गवार 120 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. तोंडल्याचे भाव काहीसे तेजीत आहेत. कोथिंबीरची जुडी 30 रुपये तर इतर पालेभाज्या 25 ते 30 रुपये जुडी होत्या. तर हिरवी मिरची 80 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. तर फळ भाज्यांमध्ये यामध्ये कांदे, बटाटे, लसूण, आले यांचे दर स्थिर आहेत.

Vegetable prices pune market
Marathwada floods impact labour: घर वाचवावं की, भाकरीमागं पळावं..!

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे

रविवारी बाजारात गवार 110 रुपये किलो, शेवगा 110, वाटाणा 120, टोमॅटो 30, भेंडी 50, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 50, गाजर 50, शिमला 50, लसूण 100 रुपये, आले 50, वांगी 50, काकडी 30, कारले 60, कांदे 100 रुपयांना पाच किलो, बटाटा 30 रुपये, बिन्स 70, पावटा 60, रताळी 50, लाल भोपळा 60, घोसाळी 60, दोडका 60, तोंडली 80, बीट 50, दुधी 50, घेवडा 70 रुपये.

Vegetable prices pune market
Kudluwadi road development: कुदळवाडी रस्त्यांचा खर्च 26 कोटींनी वाढला; ठेकेदारांना काम निविदा न काढता बहाल

पिंपरी बाजारातील दर

पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30, पालक 30, शेपू 25, राजगिरा 15, पुदिना 15, मुळा 25, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 25, करडई 15, आळू पाने 25 रुपये जुडी, आंबट चुका 25 रुपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

डबल बी 150 रुपये, गवार 120, तोंडली 120, वाटाणा 160, बीट 60, वाल 70, दोडका 60, कारली 80, भरताची वांगी 60, गवार 200, शेवगा 120, भेंडी 60, मिरची 60 - 70, फ्लॉवर 40, कोबी 40, वांगी 60, तोंडली 120, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 80, परवल 50, रताळी 80, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 60, सिमला 60 रुपये, राजमा 80 काळा, राजमा लाल 80, बिन्स 80 रुपये, तर गाजर 60 रुपये किलो असे दर आहेत.

Vegetable prices pune market
Pimpri cyber fraud crackdown: सायबर पोलिसांच्या कारवाईमुळे फसवणुकीत 30 कोटींची घट

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 10 रुपये, बटाटा 15, आले 30, लसूण 60, भेंडी 50, गवार 90 , टोमॅटो 15, वाटाणा 100, घेवडा 55, दोडका 50, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 35, काकडी 20, कारली 35, गाजर 35, फ्लॉवर 15, कोबी 15, वांगी 50, ढोबळी 50, तोंडली 50, बीट 20, शेवगा 90, घोसाळी 40, मका कणीस 50 रू, भुईमुग शेंग 50 रुपये प्रतिकिलो दर आहेत.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 5190 पालेभाजी 52900 (गड्डी), फळे आवक 708, कांदा 866, बटाटा 1230, आले 63, लसूण 1, भेंडी 152, गवार 15 टोमॅटो 758, वाटाणा 9, घेवडा 43, दोडका 33, हिरवी मिरची 259, दुधी भोपळा 49, काकडी 223, कारली 48, डांगर 81, गाजर 112, फ्लॉवर 385, कोबी 347, वांगी 134, ढोबळी 92, बीट 26, शेवगा 14, लिंबू 58, मका कणीस 63 क्विंटल अशी आवक झाली.

Vegetable prices pune market
Kojagiri Pournima milk supply: कोजागरीला मुबलक दूध! कात्रज दूध संघाचा ग्राहकांसाठी विशेष पुरवठा

मोसंबी, संत्रीला मागणी

पिंपरी फळ बाजारात मोसंबी आणि संत्रीची आवक वाढली असून 100 ते 150 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे, तर इतर फळांचे दर स्थिर आहेत.

केळी 50 - 60 रुपये डझन दराने उपलब्ध आहेत. सफरचंद 150 रुपये दीड किलो दराने तर डाळींब 100 - 150 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. ड्रॅगनफ्रुट 100 - 150 रुपये किलो, पपई 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत.

Vegetable prices pune market
PCMC councillor seats: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवक; 93 जागा राखीव, खुल्या गटासाठी फक्त 35 जागा

दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे :

सफरचंद 100 - 150 रुपये, तर मोसंबी 100 - 150, संत्री 150, डाळिंब 100 - 150, पेरू 100, पपई 60 - 70 , केळी 70 रुपये डझन, पिअर 140, ड्रॅगनफ्रुट पांढरे 150, किवी 120, नाश्पती 120 रुपये, आलुबुखार 150 रुपये किलो असे दर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news