Pimpri Chinchwad Cleanliness Survey: स्वच्छ सर्वेक्षण 2026 साठी पिंपरी-चिंचवडची जोरदार तयारी

रात्रंदिवस स्वच्छता मोहीम, आधुनिक यंत्रसामग्रीच्या जोरावर देशात अव्वल क्रमांकाचे लक्ष्य
Cleanliness Survey Preparations
Cleanliness Survey PreparationsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: स्वच्छ सर्वेक्षण 2025 स्पर्धेत राज्यात प्रथम आणि देशात सातवा क्रमांक प्राप्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2026 साठी देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने हजारो सफाई कर्मचारी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शहराचे रूप पालटण्याचे काम सध्या दिवस-रात्र करीत आहेत.

Cleanliness Survey Preparations
Pimpri Chinchwad Weather Update: पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना धूळमुक्त, स्वच्छ व प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Cleanliness Survey Preparations
Pimpri Chinchwad Young Corporators: पिंपरी-चिंचवड महापालिकेत तरुण नगरसेवकांचा दबदबा

पिंपरी-चिंचवड हे उद्योगनगरी व गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी तसेच, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे प्रमुख रस्ते दिवसभर वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे दिवसा स्वच्छता करणे मोठे आव्हान ठरते. ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने रात्रपाळी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे.

आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर

मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्वीपिंग मशीनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते. वॉटर स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवत असल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळत आहे. कर्मचारी आवश्यक सुरक्षा साहित्य परिधान करून रात्रभर कार्यरत असतात. शहर झोपेत असताना कर्मचारी शहराला नव्या पहाटेची तयारी करून देतात. महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, असा दावा महापालिकेने केला आहे.

Cleanliness Survey Preparations
Ajit Dada Pawar memorial: पिंपरी-चिंचवडमध्ये उभारणार भव्य ‘अजित सृष्टी’; अजितदादांच्या स्मारक प्रक्रियेला गती

नागरिकांनी हे करावे

ओला व सुका कचरा वेगळा द्यावा. कचरा विलगीकरण करून घरगुती कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घंटागाडीला द्यावा. तसेच, रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग टाळावे, जेणेकरून साफसफाईत अडथळे येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर कचरा टाकू नये, कोठेही थुंकू नये आणि दुकान बंद केल्यानंतर कचरा रस्ता किंवा पदपथावर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Cleanliness Survey Preparations
Kala Ghoda Art Festival PCMC: काळा घोडा कला महोत्सवात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यार्थ्यांची कला झळकणार

सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करून बळ द्यावे

शहरात राबविण्यात येणाऱ्या दिवस-रात्र स्वच्छता मोहिमेमुळे दिवसभर वाहतुकीने गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांची प्रभावी साफसफाई शक्य होत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर व सफाई कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान यामुळे शहराची स्वच्छता पातळी सातत्याने उंचावत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये उल्लेखनीय स्थान मिळवण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करावे. सार्वजनिक स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news