Vadgaon Maval Har Ghar Tiranga: वडगाव मावळमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्साह; चित्रकला, रांगोळीपासून ई-बाईक रॅलीपर्यंत विविध उपक्रम

१४ ऑगस्टपर्यंत मोफत तिरंगा वाटप; १५ ऑगस्टला ध्वजारोहण, प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Vadgaon Nagar Panchayat
Vadgaon Nagar PanchayatPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार वडगाव शहरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे व मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिली.

Vadgaon Nagar Panchayat
Talegaon Dabhade Weekly Market: तळेगावचा आठवडे बाजार रात्री ८ वाजताच बंद; उशीर केल्यास माल जप्त करण्याचा इशारा

लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली 'हर घर तिरंगा' ही मोहीम लोक चळवळ बनली आहे. या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. सन २०२६ मध्ये सुद्धा ही मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणार आहे.

Vadgaon Nagar Panchayat
Pimpri Independence Day Market: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीला वेग; पिंपरी बाजारपेठा तिरंगी झेंडे अन् सजावटीच्या साहित्याने सजल्या

चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

यासंदर्भात नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने १४ ऑगस्टपर्यंत नगरपंचायत कार्यालयामध्ये मोफत तिरंगा ध्वज वाटप करणे, सेल्फी विथ तिरंगा अंतर्गत नागरिकांनी घरोघरी, शाळा, महाविद्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकवून सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करणे, शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, तिरंगा व वंदे मातरम या विषयावर निबंध, प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Vadgaon Nagar Panchayat
Moshi Waste To Energy Accident: मोशी वेस्ट टू एनर्जी दुर्घटनेतील नऊ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ४० लाखांची मदत; कंपनीकडून शिक्षण, नोकरी अन् विम्याची जबाबदारी

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगरपंचायत कार्यालय येथे तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, शूरवीरांचा सन्मान ध्वजारोहण व प्रभात फेरी हे कार्यक्रम होणार आहेत. वडगावकर नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन हर घर तिरंगा हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन नगराध्यक्ष अबोली ढोरे व मुख्याधिकारी डॉ . प्रवीण निकम यांनी केले आहे.

Vadgaon Nagar Panchayat
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये श्वानांची दहशत; सात महिन्यांत १३ हजार ६१५ जणांना श्वानदंश

ई बाईक रॅली

१२ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयापासून तिरंगा प्रभात फेरी, १४ ऑगस्ट रोजी तिरंगा व वंदे मातरम प्रदर्शन, तसेच नगरपंचायत कार्यालयापासून वडगाव-तळेगाव साखळी रस्ता, एमआयडीसी रस्तामार्गे मुंबई-पुणे महामार्गाने वडगाव फाटा ते श्रीमंत महादजी शिंदे स्मारकापर्यंत बाईक, सायकल, ई बाईक रॅली व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news