Pimpri Independence Day Market: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीला वेग; पिंपरी बाजारपेठा तिरंगी झेंडे अन् सजावटीच्या साहित्याने सजल्या

छोट्या तिरंगी झेंड्यांसह खादीचे कपडे, जॅकेट्स, टी-शर्टला मागणी; शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगीत तालमींना सुरुवात
Pimpri Independence Day Market
Pimpri Independence Day MarketPudhari
Published on
Updated on

पिंपरी: स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त पिंपरी बाजारपेठेत तिरंगी झेंडे आणि सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे. दुकानाच्या बाहेर लावलेले तिरंगी झेंडे, झुरमुळ्या, बॅच खरेदीसाठी लावल्याचे दिसून येत आहे. पिंपरी तसेच शहरातील बाजापेठा स्वातंत्र्य दिनाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजून गेल्या आहेत.

Pimpri Independence Day Market
Moshi Waste To Energy Accident: मोशी वेस्ट टू एनर्जी दुर्घटनेतील नऊ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ४० लाखांची मदत; कंपनीकडून शिक्षण, नोकरी अन् विम्याची जबाबदारी

यंदाच्या बाजारपेठेतील प्रमुख आकर्षण म्हणजे पोशाखावर लावले जाणारे छोटे झेंडे. लहान आकारातील कागदी, कापडी व मेटलचे झेंडे उपलब्ध आहेत. त्याला ग्राहकांची मोठी पसंती आहे. सजावट करण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक कागदी पताका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Pimpri Independence Day Market
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये श्वानांची दहशत; सात महिन्यांत १३ हजार ६१५ जणांना श्वानदंश

झेंड्याचे कटाऊट, रंगीत कागदी फुले ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याबरोबरच खादीचे कपडे, टोपी, तिरंग्याची थीम असणारे जॅकेट्स, टी-शर्ट, ओढण्या अशा कपड्याच्या खरेदीसही ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. त्यातही कुर्ता, पायजमा किंवा पांढर्‍या कुर्त्याला बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी आहे.

Pimpri Independence Day Market
Pimpri Stray Dogs Attack: म्हेत्रे वस्तीत सात भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला; सीसीटीव्ही फुटेजने खळबळ

शाळा-कॉलेजात जय्यत तयारी

स्वातंत्र्य दिनासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पीटी, शौर्यगीत, लेझीम, बँड, पथ संचलन अशा विविध कार्यक्रमांच्या रंगीत तालमींनी सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे.स्वातंत्र्य दिनासाठी शाळेची स्वच्छता, वर्गांची सजावट, विविध साहित्यांची दुरुस्ती, विविध पथकांची संचलनाची तयारी अशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्न वातावरण असते.

Pimpri Independence Day Market
Raksha Bandhan Rakhi Post Service: रक्षाबंधनासाठी पोस्टाची खास सुविधा; अवघ्या १२ रुपयांत वॉटरप्रूफ कव्हर, देश-विदेशात राखी पाठविणे सोपे

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही तेवढ्याच उत्साहाने या सर्वांमध्ये सामाविष्ट होत असतात. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमधून काढल्या जाणार्‍या प्रभात फेरी यांचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम, ढोल ताशांसह विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. झेंडा वंदनासह विविध स्पर्धांचे आयोजनही या निमित्ताने करण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news