Pimpri Teachers Non Academic Work: शिक्षकांवर भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची जबाबदारी; संघटनांचा तीव्र विरोध

अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांवर नवी जबाबदारी लादल्याने संताप
stray dogs
stray dogsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने शाळा परिसर स्वच्छतेसोबतच भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम शिक्षकांवर सोपविले आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून एका शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या पत्रकाचा सर्वच शिक्षक संस्थांनी निषेध केला आहे.

stray dogs
Ajit Pawar PCMC Election: ‘चुका सांगणे म्हणजे युतीधर्म न पाळणे का?’ : अजित पवारांचा फडणवीसांना सवाल

देशभरात वाढलेल्या भटक्या कुर्त्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी मनोडल अधिकारीफ नेमण्याचे परिपत्रक काढले होते. याच धर्तीवर आता शालेय शिक्षण विभागानेही अशाच आशयाचे परिपत्रक काढले आहे. एकीकडे शिक्षणमंत्री अशैक्षणिक कामे कमी केल्याची ग्वाही देत असताना दुसऱ्या बाजूला अधिकारी मात्र एकापेक्षा एक अशैक्षणिक कामांना शिक्षकांना जुंपत आहेत.

stray dogs
Pimpri Election Violence: पिंपरीत राष्ट्रवादी उमेदवाराच्या कुटुंबावर हल्ला

या पत्रात, प्रत्येक शाळेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी शाळेतीलच एका शिक्षकाची नियुक्ती मनोडल अधिकारीफ म्हणून करायची आहे. या शिक्षकाची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावून स्थानिक महापालिका किंवा संबंधित यंत्रणेला कळवणेही आवश्यक आहे. भटके कुत्रे शाळेच्या आवारात शिरू नयेत किंवा निवाऱ्याला असू नयेत, याची जबाबदारी या शिक्षकाची असेल,फ असे म्हटले आहे.

stray dogs
PMPML Bus Ticket Fine: पीएमपी बसमध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 1.10 कोटींचा दंड वसूल

..या आहेत सूचना

  • भटक्या श्वानांचा प्रवेश रोखण्यासाठी पुरेसे कुंपण, सीमाभिंती, दरवाजे आणि इतर संरचनात्मक करावी.

  • प्रत्येक शाळेच्या परिसराची देखभाल, स्वच्छतेसाठी उघड्यावरील खाद्यपदार्थाची विल्हेवाट लावावी.

  • शाळेतील नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी माहिती प्रवेशद्वारावर ठळकपणे प्रदर्शित करावी.

  • शिक्षकांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना श्वानांच्या आक्रमक स्वभावाची माहिती द्यावी.

  • श्वानाच्या स्वभावानुसार प्रतिबंधात्मक वर्तन, चावल्यास प्रथमोपचार आणि तात्काळ माहितीसाठी प्रबोधन सत्र आयोजित करावे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन केले निर्देशाचे अनुपालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येईल.

stray dogs
Talegaon Dabhade Councillor selection: 13 जानेवारीला उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने तशी नियमावली तयार करून दिली आहे. आम्ही सर्व शाळांच्या आवारातील कुर्त्यांची आकडेवारी शासनाला सादर केली आहे.

संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग)

शिक्षकांचे मुख्य काम हे विद्यार्थी घडवणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हेच आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करावे, ही आमची ठाम मागणी आहे. या कामास आमचा विरोध आहे.

मनोज मराठे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news