

तळेगाव दाभाडे: मंगळवार 13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड होणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे हे नगराध्यक्षपदी प्रचंड बहुमताने निवडून आले.
तर 28 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. या निवडणूक प्रक्रियेत अनेक इच्छुकांनी माघार घेतली होती. तर काहींनी पक्षश्रेष्ठींचे म्हणणं मानून निवडणुकीचे फॉर्म भरले नव्हते.
निवडून आलेल्या 28 पैकी 21 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 7 जणांपैकी 4 जण राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे ठरल्याप्रमाणे या 4 जणांपैकी एकाची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते.
पण खरी कसोटी लागणार आहे ती स्वीकृत नगरसेवक पदासाठी कारण अनेक जणांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते स्वीकृतसाठी आस लावून बसले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे 1 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 असे तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात हे पद एका वर्षासाठी देतात की आणखी कमी काळासाठी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या 13 तारखेला या पदांसाठी कोणाची वर्णी लागेल याबाबतीत चर्चा सुरू आहे.