Talwade Medical Shop License Fraud: बनावट सह्यांनी मेडिकल शॉपचा परवाना स्वतःच्या नावे; दोन डॉक्टरांवर गुन्हा

तळवडे मेडिकलच्या भागीदारीतील परवान्यात परस्पर बदल केल्याचा आरोप; कर्ज घेतल्याचेही फिर्यादीत नमूद
Doctor
DoctorPudhari
Published on
Updated on

पिंपरी: तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज आणि संमतिपत्रावर बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे अन्न व औषध प्रशासनाकडे सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे भागीदारीतील परवाना रद्द करून तो स्वतःच्या नावे घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात १२ ऑक्टोबर २०२३ पासून हा प्रकार घडला.

Doctor
Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात मेट्रोला पुणेकरांची पसंती; पहिल्याच दिवशी २.६२ लाख प्रवाशांचा प्रवास

डॉ. प्रशांत मधुकर पाटील-कांबळे (वय ३४, रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली) आणि डॉ. रविकांत अशोक हडपद-चिंचवडे (वय ३५, रा. चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संजय मोहनसिंग राठोड (वय ५४, रा. मोशी, पुणे) यांनी गुरुवारी (दि. १७) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Doctor
Pimpri Chinchwad Ganesh Idol Photo Ban: गणेशमूर्तींचे विसर्जनानंतरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथे 'तळवडे मेडिकल शॉप' नावाने दुकान आहे. या मेडिकलच्या परवान्यासंदर्भात आरोपींनी भागीदारीतील परवाना रद्द करण्यासाठी अर्ज आणि संमतिपत्रावर बनावट सह्या केल्या. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संबंधित कार्यालयाकडून परवाना रद्द करून तो स्वतःच्या नावे करून घेतला.

Doctor
Pimpri Motorized Number Plate: बटण दाबलं की नंबर प्लेटच गायब! पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर ‘मोटराइज्ड’ प्लेटचे नवे आव्हान

तसेच, आरोपी रविकांत याने परवाना फॉर्म क्रमांक २० मध्ये परस्पर बदल करून दुसऱ्याचे नाव वगळले. एकाच्याच नावावर परवाना करून भारती एक्सा लाइफच्या चिंचवड शाखेकडून कर्ज घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारातून दोघांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news