

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे परिसरात पावसाने निरोप घेतला असून कडाक्याची थंडी पडली असून थंडीत व्यायाम करणा-यांची संख्या वाढली आहे.तसेच मॉर्निंग वॉक करणा-यांची संख्याही वाढली आहे.यामध्ये लहानमुले महिलांचाही मोठा सहभाग असतो.
अनेक मुले रनींग,सायकलींगचाही व्यायाम करतात.डीपी रोड,तळेगाव स्टेशन तलाव कातवी रोड अशा अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी गर्दी होत आहे.परंतु डीपी रोड,कातवी रोड आदी ठिकाणी अनेकजण पाळीव कुत्री घेवून सकाळी सकाळी फिरतात.कोण ओळखीचे दिसले तर कुत्रे हातात असताना गप्पा मारतात काहीजण ही कुत्री रोडवर मोकळी सोडतात.
यावेळी मॉर्निंग वॉक करणा-यांची पळापळ होते यावेळी किंवा ही कुत्री हातातून निसटली तरअनेकांना चावतात अशा घटना तळेगाव परिसरात ठिकठिकाणी घडलेल्या आहेत.लहान मुलांना,महिलांना जेष्ठ नागरिकांना अशी कुत्री चावून जिवीत हानीही झालेली आहे.
अशा घटना घडल्यानंतर भांडणे होवून कायदेशीर बाबीही घडल्या आहेत भविष्यातही घडण्याच्या शक्यता आहे.तसेच या लोकांकडे कुत्री पाळण्याचा परवाना आहे की नाही हेही पाहणे आवश्यक आहे तरी प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
पाळीव कुत्री पाळणा-यांच्या हलगर्जीपणे मोकळी सुटून अनेक जणांना चावली आहेत तरी प्रशासनाने अशी कुत्री घेवून फिरणा-यांवर कारवाई करावी.
विठ्ठल भेगडे जेष्ठ नागरिक तळेगाव