Talegaon Water Meter: तळेगाव नगरपरिषदेकडून पाणी मीटर सक्ती; नागरिकांत तीव्र असंतोष

मीटर न बसविल्यास दंड व पाणीपुरवठा बंद करण्याचे संकेत; कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याची मागणी
Talegaon Water Meter
Talegaon Water MeterPudhari
Published on
Updated on

सोमाटणे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत घरगुती व व्यावसायिक नळ जोडणीवर पाणी मीटर बसवणे सक्तीचे करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाकडून पाणी मीटर न बसविल्यास दंड, पाणीपुरवठा खंडित करणे अशा कारवाईचे संकेत दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Talegaon Water Meter
Khandala Ghat Traffic: ख्रिसमस-न्यू इयर सुट्यांचा परिणाम; खंडाळा घाटात 8 ते 10 किमीपर्यंत वाहतूककोंडी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत सर्व सोसायट्यांमध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Talegaon Water Meter
Maharashtra Sugar Production 2025: राज्यात 38 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन; 207 कारखान्यांना ऊस गाळप परवाने

नागरिकांना आर्थिक भुर्दंड

या संपूर्ण प्रकारामागे न्यायालयाचा आदेश किंवा राज्य शासनाचा निर्णय आहे का? याबाबत नगरपरिषदेकडून अद्याप स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बळजबरी होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने पाणी मीटर सक्तीबाबत न्यायालयाचा आदेश, राज्य शासनाचा जीआर/परिपत्रक नगरपरिषद ठरावाची प्रत, मीटर न बसविल्यास कारवाईचे कायदेशीर आधार हे सर्व सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Talegaon Water Meter
Hand Shake Theft: हात मिळवण्याच्या बहाण्याने शिवसेना पदाधिकाऱ्याला गंडा; सोन्याची अंगठी पळवली

या विषयावर माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत अधिकृत माहिती मागविण्यात आली असून, नगरपरिषदेकडून कायदेशीर आधार स्पष्ट न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यापूर्वी पारदर्शकता आणि कायदेशीर स्पष्टता गरजेची आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news