Maharashtra Sugar Production 2025: राज्यात 38 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन; 207 कारखान्यांना ऊस गाळप परवाने

2025-26 हंगामात 446 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण; उताऱ्यात कोल्हापूर आघाडीवर, गाळपात पुणे विभाग पुढे
Sugar
SugarPudhari
Published on
Updated on

पुणे : राज्यातील यंदाच्या 2025-26 च्या हंगामामध्ये आत्तापर्यंत 446 लाख मे. टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तर 8.52 टक्क्यांइतक्या निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 38 लाख मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन हाती आलेले असून तशी माहिती साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून मिळाली.

Sugar
Ration Shops Pimpri: शिधापत्रिकाधारकांची पायपीट थांबणार कधी? सात रेशन दुकाने अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

साखर आयुक्तालयाने यंदाच्या हंगामात 102 सहकारी व 105 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 191 कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. त्यामध्ये 95 सहकारी आणि 96 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

Sugar
Koregaon Bhima Jaystambh: जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

कोल्हापूर विभागात 37 कारखान्यांकडून 98.79 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर सर्वाधिक 10 टक्के उताऱ्यानुसार 98.77 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ऊस गाळपातील पुणे विभागाची आघाडी तूर्त कायम आहे. या विभागातील 30 कारखान्यांकडून 109.34 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 8.78 टक्के 96 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केलेले आहे.

Sugar
Banana Price Crash: केळीला कवडीमोल भाव; आंबेगावात शेळ्या-मेंढ्यांचा केळीवर ताव

सोलापूर विभागात सर्वाधिक 43 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यांनी आत्तापर्यंत 94.63 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर 7.67 टक्के उताऱ्यानुसार 72.6 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. अहिल्यानगर विभागातील 26 कारखान्यांनी 53.23 लाख मे.टन ऊस गाळप पूर्णकेले आहे.

Sugar
Drone spraying Agriculture: बिबट्यांच्या भीतीतून दिलासा; आंबेगावात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा प्रभावी प्रयोग

तर 7.96 टक्के उताऱ्यानुसार 42.38 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केलेले आहे. राज्यातील अन्य विभागातील ऊस गाळप तुलनेने कमी आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.44 लाख मे.टन, नांदेड 43.89 लाख मे.टन, अमरावती 4.69 लाख मे.टन तर नागपूर विभागात जेमतेम तीन हजार मे.टनाइतके ऊस गाळप झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news