

अंगठी पळवली
लोणावळा : दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला हात दाखवून थांबवले आणि त्यानंतर हात मिळवण्याचा बहाना करत त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेत पोबारा केला. 24 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऑलवेल बंगल्यासमोर ही घटना घडली आहे.
याप्रकरणी शिवसेनेचे पुणे जिल्हा सल्लागार मारुती खोले (वय 65, नांगरगाव लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. मारुती खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून गवळीवाडा नाका परिसरामध्ये जात असताना घरापासूनच काही अंतरावर पुढे गेल्यानंतर अन्नपूर्णा भोजनालय ते आगवाला चाळ रस्त्यादरम्यान समोरून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांना हात दाखवत थांबवले. त्यांच्या हातामध्ये एक प्लास्टिकची पिशवी दिली, ज्यामध्ये दोन-तीन बिस्कीटचे पुढे व एक हजार रुपये होते. येथे जवळपास अनाथ आश्रम अथवा मंदिर असल्यास तेथे दान करा, असे त्यांना सांगितले.
मारुती खोले यांनी तात्काळ 112 नंबर वर फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिस तब्बल दोन तासांनी घटनास्थळीत दाखल झाले असल्याचे खोले यांनी सांगितले. लोणावळा शहरामध्ये अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ग्रस्त वाढवणे गरजेचे आहे. तसेच, नागरिकांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो मौल्यवान ऐवज अंगावर घालून घराबाहेर पडू नये, निर्जन रस्त्याने जात असताना कोणी थांबवल्यास थांबू नये, स्वतःची काळजी स्वतः घेणेदेखील गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
खोले यांनी समोरच मंदिर आहे आपण तिथे जाऊन स्वतः द्या, असे म्हणाले. त्यावेळी आम्हाला खूप घाई आहे आपण आमची तेवढी मदत करा, असे म्हणत त्यांच्या हातात पिशवी देत हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातामधील सोन्याची अंगठी ओढून घेत दुचाकीवरून पोबारा केला. हातामध्ये पिशवी दिल्यानंतर एका तरुणांनी खोले यांच्या डोळ्यासमोर दोन बोटे नेली व अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले, त्याच वेळेमध्ये त्यांच्या हातातील अंगठी हातचलाखीने ओढून घेत त्या दोघांनी तेथून पळ काढला.