

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा 458 कोटी 62 लाख 12 हजार 306 रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले. 9 लाख 80 हजार 330 शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. या अंदाजपत्रकानुसार काही बाबींकरिता अधिकची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर, काही बाबींकरिता रक्कम वजा करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण अंदाजपत्रकातील रकमेमध्ये थोड्याफार प्रमाणात फेरफार होऊ शकतो, अशी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सभेनंतर माहिती दिली. अंदाजपत्रकात पाणीकरात वाढ करण्याची तरतूद करण्यात आली होती; परंतु सर्व नगरसेवकांनी याला विरोध दर्शवल्याने तूर्तास पाणीकरात वाढ करण्यात आलेली नाही.
शुक्रवारी (दि. 27) कविवर्य कुसुमाग््राजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. सुमारे सात तास चाललेल्या या सभेच्या सुरुवातीस बजेटचे विवरण पत्र किमान तीन दिवस आधी मिळणे अपेक्षित आहे. महसूल खर्च एवढा कसा वाढवला? असे मुद्दे उपनगराध्यक्ष गणेश काकडे व विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांनी उपस्थित केले. या अर्थसंकल्पातील जमा व खर्चाचा ताळेबंद सादर करण्यात आला; परंतु सभेत झालेल्या चर्चेनुसार खर्चाच्या तरतुदीचा ताळेबंद बदलणार असल्यास चित्र दिसत आहे. सुमारे साडेचारशे कोटींपेक्षा जास्तीच्या अंदाजे खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
या सभेत पाणीपुरवठा, शाळा, वाचनालय, अभ्यासिका, उद्यान, वीजबिलात तरतूद, नगर परिषदेच्या व्यावसायिक इमारती, स्मशानभूमी, दफनभूमी आदींसाठी तरतूद करण्यात आली. या सभेत नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेते हेमलता खळदे, इंद्रकुमार ओसवाल, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी लेखापरीक्षक स्मृती सोमवंशी यांनी बजेटचे वाचन केले.
नगर परिषद शाळांसाठी 2 कोटी मंजूर
अंदाजपत्रकात शिक्षण विभागावर जास्तीत जास्त खर्च करण्यात यावा, असे सर्व नगरसेवकांनी सुचवले असल्यामुळे नगर परिषद शाळांसाठी 2 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. शाळांच्या मैदानाकरिता 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शाळा बांधकाम, क्रीडांगण, साहित्य, शिष्यवृत्ती, गणवेश आदींसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा पंप मोटर इत्यादींची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती व देखभाल, अनधिकृत नळ कनेक्शन शोध बिल वाटप, बोरवेल दुरुस्ती याकरिता 1 कोटी 81 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पाणी जोडणी दुरुस्ती साहित्य खरेदीकरिता एक कोटी रुपये, पाण्याची खरेदी व पाणी वापर बिल याकरिता दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबत पाईपलाईन टाकणे, पाणी मोजमाप यंत्र बसवणे, पंप खरेदी व अनुषंगिक खर्च, अशुद्ध पाणीप्रक्रिया करणे इत्यादी कामांकरिता 3 कोटी 26 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीकरवाढ टळली
अंदाजपत्रकात पाणीकर वाढवण्याबाबत तरतूद करण्यात आली होती; परंतु सर्व नगरसेवकांनी याला विरोध दर्शवल्याने तूर्तास पाणीकरात वाढ करण्यात आलेली नाही. परिसरात असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 10 कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 20 कोटी, सर्वसाधारण रस्ता अनुदान 1 कोटी, विशेष रस्ता अनुदान 5 कोटी, अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 6 कोटी, दलितेत्तर योजना 2 कोटी 50 लाख, नाट्यगृह बांधकाम अनुदान 8 कोटी, राज्यतळे संवर्धन निधी अनुदान 1 कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर 35 कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर 65 कोटी, अग्निशमन अनुदान 50 लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
प्रशासकीय कामांकरिता 11 कोटी 66 लाखांची तरतूद
प्रशासकीय खर्चात स्ट्रीट लाईट वीजबिल, पाणीपुरवठा वीजबिल, कार्यालयीन वीजबिल, चहापान व अल्पोपहारावरील खर्च, मुद्रण व लेखन सामग््राी छपाई, स्टेशनरी, झेरॉक्स बिल टाईप करणे, नगरपालिका वाहनांचा विमा, मालमत्तेचा विमा, रेकॉर्ड बांधणीसाठी कापड खरेदी इत्यादी कामांकरिता एकूण 11 कोटी 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण संच मांडणी व विद्युत सामग््राी दुरुस्ती यामध्ये विद्युत देखभाल व दुरुस्ती विषयककामे, पथदिवे दुरुस्ती, सिग्नल देखभाल दुरुस्ती, मीटर दुरुस्ती, नवीन पोल उभे करून कार्यान्वित करणे, पोल शिफ्टिंग दुरुस्ती एक्सप्रेस फीडर व पाणीपुरवठा विद्युतविषयक कामे दुरुस्ती याकरिता 2 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
डोळसनाथ मंदिर विकासासाठी 2 कोटी
नफा फंडातून डोळसनाथ मंदिर विकासासाठी 2 कोटी रुपये, दफन भूमिकरिता 15 लाख रुपये, शौचालय उभारणीकरिता 2 कोटी 35 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. गटारी व नाले बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, कचरा साईट डेव्हलपमेंट याकरिता 2 कोटी 25 लाख रुपये निधी तर रस्ते व पदपथ नफा फंड, काँक्रीट रस्ता बांधकाम करणे, शहरात पदपथ बांधणे, डीपी रोड विकास योजना, रस्ते फलक व इतर याकरिता एकूण 3 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान विभागात उद्यान बगीचा विकसित करणे, खेळणी बसवणे, व्यायाम शाळेसाठी क्रीडा साहित्य खरेदी, तळे संवर्धन निधी, शहर सौंदर्यकरण, वाहन विकास योजना, ऐतिहासिक वस्तू संग््राहालय या सर्व कामांसाठी 3 कोटी 77 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.