Pimpri Chinchwad News | पिंपरीत कानठ्याळ कीर्र करणाऱ्या बुलेटच्या ३९९ सायलन्सरवर बुलडोझर

पोलिसांकडून विशेष मोहिमेत धडकी भरवणारे सायलन्सर नष्ट
Bullet Silencer Destruction Pimpri
Bullet Silencer Destruction PimpriPudhari
Published on
Updated on

Bullet Silencer Destruction Pimpri

पिंपरी : शहरातील बुलेट दुचाकींच्या धडकी भरवणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला अखेर बुलडोझरखाली चिरडण्यात आले. सायलन्सरमध्ये अनधिकृत बदल करून मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ३९९ सायलन्सर नष्ट केले. नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.

वाहनांच्या सायलन्सरमध्ये फेरफार करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई सुरू आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने सन २०२५ मध्ये अशा प्रकारच्या १४ हजार ५९२ प्रकरणांमध्ये कारवाई करून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचा आकारला होता. तसेच, जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १ हजार ५४३ प्रकरणांमध्ये कारवाई करत १८ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Bullet Silencer Destruction Pimpri
Pimpri Chinchwad Water Supply Disruption: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प; निगडी, रावेत, आकुर्डीत नागरिक संतप्त

दरम्यान, २४ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत वाहतूक शाखेकडून सायलेन्सर विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध वाहतूक विभागांनी समन्वय साधत प्रमुख चौकांमध्ये तपासणी नाके उभारले. या मोहिमेत ३६८ बुलेट सायलन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलन्सरसह एकूण ३९९ सायलन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news