Pimpri Holi Market 2026: पिंपरीत होळी बाजाराची धूम; कलर टॅंक, छत्री अन् इलेक्ट्रिक गनची क्रेझ

30 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत पिचकाऱ्या; पर्यावरणपूरक रंगांना नागरिकांची पसंती
Pimpri Holi Market 2026
Pimpri Holi Market 2026Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: होळी आणि धुलिवंदन सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त बाजारात विविध रंग आणि पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. शहर परिसरातील दुकानांत रंगखरेदीसाठी बच्चेकंपनी व नागरिकांची गर्दी होत आहे. यंदा कलरचा ग्लास, कलर छत्री आणि ईलेक्ट्रिक गन असे अनोखे पर्याय उपलब्ध झाले आहे.

Pimpri Holi Market 2026
PCMC Budget 2026: रखडलेल्या प्रकल्पांवरून पीसीएमसी प्रशासनावर टीका; नव्या अर्थसंकल्पाकडे नजर

लहान मुलांना होळीचा रंग खेळण्याचे वेगळेच आकर्षण असते. चिमुकल्यांच्या हट्टासाठी पालक विविध आकारातील पिचकाऱ्या विकत घेताना दिसत आहेत. या पिचकाऱ्या 30 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बंदुकीच्या आणि वॉटर टॅंकच्या आकारातील पिचकाऱ्यादेखील मुलांच्या पसंतीस उतरत आहेत. रासायनिक रंग हे घातक असल्यामुळे बाजारपेठेत पर्यावरणपूरक रंग विक्रीस ठेवण्यात आले आहेत. नागरिकदेखील पर्यावरणपूरक रंगास अधिक पंसती देत आहेत.

Pimpri Holi Market 2026
Pimpri Chinchwad News | पिंपरीत कानठ्याळ कीर्र करणाऱ्या बुलेटच्या ३९९ सायलन्सरवर बुलडोझर

बाजारात 100 ते 150 रुपये किलोपर्यंत रंगांची विक्री केली जात आहे. लहान मुलांना आकर्षित करणारी टँक, एअर गन, बॅग स्टाइल, पाइप, स्मोक स्टील, बासरीच्या आकारातील, कार्टूनच्या अनेक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजरात नैसर्गिक रंगाला मोठी मागणी आहे. बाजारात रंगांची उधळण करण्यासाठी बाजार कलर टॅंक दाखल झाली आहे. अग्निशमन टाकीप्रमाणे दिसणारी कलर टॅंक बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यात विविध कलर भरून ते स्प्रे करता येतात व टॅंक रिकामी झाल्यास त्यात रंग भरून पुन्हा वापरात आणता येते. विशेषत: तरुणांकडून टॅंकची खरेदी केली जात आहे.

Pimpri Holi Market 2026
Moshi Garbage Depot: मोशी कचरा डेपोतील रासायनिक सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत; जनावरांचे मृत्यू, नागरिकांच्या आरोग्यावर संकट

कलरची छत्री

बाजारात यंदा कलरची छत्रीदेखील उपलब्ध झाली आहे. ही छत्री उघडली की समोरच्या व्यक्तीवर रंग उडविला जातो. तर दुसऱ्या व्यक्तीने रंग उडविल्यास छत्रीने बचावदेखील करता येतो.

कलर ग्लास

पेपर ग्लाससारखा दिसणारा हा ग्लास पाण्याने भरल्यानंतर रंगीत पाणी तयार होते. हे पाणी दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर फेकून तिला रंगविण्याचा आनंद घेता येतो. बऱ्याचदा रंग पाहून लोक पळून जातात. पण या ग्लासमधील पाण्यात रंग तयार होतो, हे सहसा कोणाला माहिती नसल्याने एखाद्याला रंगविण्याचा आनंद घेता येतो.

Pimpri Holi Market 2026
Indrayani River Pollution Dudulgaon: इंद्रायणी नदीत थेट ड्रेनेजचे पाणी; डुडुळगाव परिसरात प्रदूषण गंभीर, आळंदीच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह

कोरड्या रंगाचे कलर सिलिंडर

दुकानांमध्ये कोरडा रंग उडविणारे छोट्या आणि मोठ्या आकारातील सिलिंडरदेखील उपलब्ध झाले आहेत. यांची किंमत 600 ते 1000 रूपयांपर्यंत आहे. या सिलिंडरवर वरती छोटा पंप असतो. ज्याव्दारे कोरडा रंग हवेत स्प्रेसारखा उडविला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news