

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेच्या २८ प्रभागापैकी १९प्रभागात निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तेथील मतदार नगरसेवक पदांसाठी मतदान करणेपासून वंचित राहीले असून तसेच तेथे नोटाचे पर्यायाचा वापर करता न आल्यामुळे मतदार नाराज आहेत आणि राहीलेल्या ९ पैकी ६ प्रभागातील मतदान स्थगित झाल्यामुळे आचारसंहीता लांबली असून यामुळे नागरिकांची सरकारी कामे,महत्वाची कामे रखडली असून लांबणीवर पडली आहेत, यामुळे नागरिकही नाराज आहेत.
जी कामे आचारसंहितेच्या कक्षेत येत नाहीत ती कामेही टाळाटाळ करण्याच्या हेतूने अथवा नियमाची व्यवस्थित माहीती नसल्यामुळे आचार संहीतेच्या नावाखाली अनेक ठिकाणी लांबणीवर पडली आहेत नागरिक कामासाठी गेले की आचारसंहीता झाल्यावर बघू असे अनेक ठिकाणी सांगण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोगाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचाही संताप नागरिकांत दिसून येत आहे.यापूर्वी असे कधीही झाले नाही याबाबत नागरिक चर्चा करीत आहेत.
जिल्ह्यात सगळ्यात कमी मतदान (४९.२४टक्के) तळेगाव दाभाडे येथे झाले असून रविवारी(दि.२१)होणार असलेल्या मतमोजणी बाबत आणि निकाला बाबत नागरिकांत फारसा उत्साह दिसून येत नाही. मंगळवारी(दि.०२) होणारी निवडणूक ६ प्रभागात स्थगित झाली असून आता शनिवारी( दि.२०) होणार असल्यामुळे तोपर्यंत मतदारांची मनधरणी करण्यात,वेळ देण्यात आणि होत असलेल्या खर्चामुळे उमेदवारांचीही दमछाक होत आहे आणि ज्या प्रभागात दि.०२रोजी निवडणूक झाली तेथील उमेदवारांना सुमारे ४-५दिवसच चिन्हासहित प्रचार करणेस मिळाले यामुळे तेही नाराज आहेत.
ज्या प्रभागातील शनिवारी(दि.२०)पर्यंत निवडणूक लांबली त्यांना सुमारे १७-१८दिवस प्रचार करणेची संधी मिळाली ही विसंगती दिसत असले बाबत उमेदवार आणि मतदार चर्चा करीत आहे.निकाल लांबल्यामुळे निवडणूक झालेल्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
तसेच निवडणूक शनिवारी(दि.२०)होणार की नाही याबाबत उमेदवारांच्या मनात आणि आचारसंहीता आणखी लांबते की काय याबाबत नागरिकांच्या मनात धाकधूक आहे दर निवडणूकी प्रमाणे कट्टयावर,ओट्यावर,वसाहतीत गल्लोगल्ली आदी ठिकाणी निकालाबाबत चर्चा करताना फारसे कोणी दिसत नाहीत.