Spices Price India: उन्हाळा सुरू होताच मसाल्यांची लगबग; मिरची व गरम मसाल्यांच्या खरेदीला वेग

लालमिरचीची बाजारात मोठी आवक; वाढत्या दरांनाही महिलांची मसाला बनविण्यासाठी धावपळ
Spices Price India
Spices Price IndiaPudhari
Published on
Updated on

पिंपरी : उन्हाळा सुरू झाला की, महिला मसाला तयार करायच्या तयारीला लागतात. उन्हामुळे बाजारात लालमिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मिरचीचे दर वाढले तरी दररोजच्या जेवणाची चव वाढविणाऱ्या मसाल्यांसाठी महिलांची खरेदी सुरू आहे. उन्हाळ्यामुळे घरोघर मसाला बनविण्यास सुरुवात झाली आहे.

Spices Price India
PCMC Water Tank Cleaning Contract: महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता; 2.24 कोटींच्या कामास मंजुरी

वातावरणात उष्णता वाढायला सुरुवात झाली की, अनेक गृहिणी मसाला करण्याच्या तयारीला लागतात. लालमिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट व मसाला करून ठेवला जातो. वर्षभर किंवा सहा महिन्यांचा मसाला केला की, मसाल्यामुळे महिलांचा जेवण बनविण्याचा वेळ वाचतो. रोजची जेवणाची जमवाजमव करताना एकादी गोष्टी नसली तरी मसाला असला की महिलांचे काम सोपे होते. उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की, महिलांकडून वाळवण, मसाले बनविण्याची तयारी सुरू होते.

Spices Price India
Pimpri Chinchwad Plastic Fine: प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महापालिकेची धडक कारवाई; 31 हजारांचा दंड वसूल

दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनविण्याच्या वेगळ्या पद्धधती आहेत. सुका मसाला, लाला मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला असे मसाल्याचे प्रकार आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात. मसाल्याच्या खरेदीला वेग आला असून तिखट, बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मिरची पावडर, खडा मसाला यांना मागणी वाढली आहे. मार्च, एप्रिल मे दरम्यान वाळवणाची कामे झाल्यानंतर मसाला तयार करण्याची घाई होते. मिरची खरेदीपासून मसाल्यासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. या मसाल्याने बनविलेल्या स्वयंपाकाला विशिष्ट चव येते.

Spices Price India
PCMC Job Scam: पालिकेत नोकरी, पण नियुक्तीपत्र बोगस!

गरम मसाल्याचे दर प्रतिकिलोप्रमाणे : धने 125 रूपये, जिरे 280 रूपये, लवंगमध्ये लालपरी, मेढा, कोलंबो असे प्रकार असून 800 रुपये किलो दर आहे. काळीमिरी 750 - 950 रुपये किलो, दालचिनी 300 - 480 रुपये, थायलंडवरून येणारी सिगारेट दालचिनी 450 - 550 रुपये, तेजपत्ता 250 रुपये, मसाला वेलची 1800 - 23000 रुपये, हळकुंड 350 रुपये, दगडफुल 1500 रुपये, नागकेशर 3000 रुपये, हिंगखडा 1500 रुपये, गोड वेलची 5000 रुपये, चक्रीफुल 450 रुपये, जायपत्री 2200 - 3500, रामपत्री 1300 - 1600 मिरचीचे दर पुढील प्रमाणे..

मिरची प्रकार होलसेल दर, किरकोळ दर, लवंगी 210-250 - 300 ब्याडगी 350 - 400-500 काश्मीर 550 600 संकेश्वरी 250-300, गुंटूर 210 - 250- 300.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news