Lonavala Knife Attack: लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Balloon Sellers Clash
Balloon Sellers ClashPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: लोणावळा शहरामध्ये मुख्य चौक व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फुगे विकणाऱ्या दोन जणांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आहे.

Balloon Sellers Clash
Andra Dam Affected Farmers: आंद्रा धरणग्रस्तांचा २६ वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा; पाइपलाइनचे काम रोखण्याचा इशारा

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत एका बंद दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये काही फुगेवाले नागरिक व इतर नागरिक झोपले होते. या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या झोपलेल्या व्यक्तीवर अचानकपणे हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झोपेतून उठलेल्या त्या व्यक्तीनेदेखील हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर प्रतिहल्ला केला.

Balloon Sellers Clash
Smita Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना डॉक्टर असोसिएशनचा पाठिंबा

या दोन्ही व्यक्तींच्या हातामध्ये चाकूसारख्या धारदार वस्तू होत्या व त्याने ते एकमेकांना मारत होते. दोघांचेही हल्ल्यानंतर त्या ठिकाणी रक्तस्त्राव झाला. त्यामुळे आजूबाजूला झोपलेल्या इतर नागरिकांनी त्यांना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे.

Balloon Sellers Clash
Pimpri Dandiya Dispute: पिंपरीत दांडियाच्या जुन्या वादातून दोन गटांत राडा; कोयत्याने हल्ला, सहा जणांना अटक

पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना

लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळीदेखील पर्यटकांची वर्दळ शहरामध्ये सुरू असते. तसेच पहाटेदेखील अनेक पर्यटक शहरामध्ये दाखल होत असतात. नशा करून रात्री अपरात्री वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणाऱ्या या नागरिकांकडून पर्यटक असो वा स्थानिक नागरिक यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

Balloon Sellers Clash
Pimpri Chinchwad Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात महापालिकेचे टँकर बीआरटीचे दुभाजक धुण्यासाठी!

मागील काळामध्ये नगरपरिषद व तत्कालीन लोकप्रतिनिधी तसेच पोलिस अधिकारी यांनी या फुगे विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना लोणावळा शहरातून हद्दपार केले होते. मात्र, काही दिवस शहराबाहेर गेल्यानंतर पुन्हा यांचा तांडा एक एक करत लोणावळा शहरामध्ये दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news