Sant Tukaram Maharaj Palkhi: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांची पालखी पिंपरीत दाखल; वारकऱ्यांच्या स्वागताने शहर दुमदुमले

टाळ-मृदंगाचा निनाद, ढोल-ताशांचा जल्लोष; पिंपरीतील काळभैरवनाथ मंदिरात पालखीचा मुक्काम
Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj PalkhiPudhari
Published on
Updated on

पिंपरी: आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून हरिनामाच्या जयघोषात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरहून २९ जुलै रोजी देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाला. शनिवार ८ ऑगस्ट रोजी पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. पिंपरी येथे आगमन होताच टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. पालखी रविवार (दि. ९) देहूत परतणार असून, पालखी आषाढी सोहळ्याचा प्रवास पूर्ण होणार आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Chinchwad Indrayani River Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी-चिंचवडमध्ये वाद; ४३० कोटींच्या मंजुरीवर विरोधकांचे गंभीर आरोप

श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा पुण्यातील मुक्काम आटोपून शनिवारी सकाळी सहा वाजता पिंपरीकडे मार्गस्थ झाला. पिंपरी येथील गोकुळ हॉटेल येथे पावणेचार वाजता पालखी सोहळा पोचला. या ठिकाणी सामाजिक कायकर्ते रमेश वाघेरे यांनी पालखीच्या स्वागताचे नियोजन केले होते. पालखी विसावल्यानंतर चहा आणि नाश्ताची सोय केली होती. भाविकांना चहा, राजगिरा लाडू, वडापाव, बिस्कीट, केळी आदींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते. सामाजिक कायकर्ते रमेश वाघेरे यांनी देहू संस्थान कमिटीचे अध्यक्ष गणेश महाराज मोरे यांचा शाल, श्रीफळ सन्मान केला.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Chinchwad Wrong Side Driving: पिंपरी-चिंचवडमध्ये राँग साईडचा धुमाकूळ; पीएमपी बसचालकांची कसरत, अपघाताचा धोका वाढला

याप्रसंगी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, खाजाभाई कुरेशी, अमर नाणेकर, शिवाजी साखरे, आनंद आगरवाल, सुरेश घोरपडे, महादेव गुंजाळ आदी उपस्थित होते. पालखी विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वीणेकरी आणि वारकरी यांनीदेखील रस्त्याच्या कडेला विसावा घेतला होता. त्या वेळी नागरिकांनी त्यांचा चहा, पाणी, बिस्किट पुड्याचे वाटप करुन मनोभावे पाहुणचार केला. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी मार्गावर वाहनांना बंदी करण्यात आली होती.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimple Gurav Garbage Dumping: पिंपळे गुरवमध्ये नदीकाठावर कचऱ्याचे डोंगर; डुकरांचा सुळसुळाट, हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

गोकुळ हॉटेलच्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास विसावा घेतल्यानंतर पालखी हरिनामाच्या गजरात पिंपरीगावाकडे मार्गस्थ झाली. पिंपरीगावात महापालिकेतर्फे महात्मा फुले विद्यालयाजवळ चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. वारकर्‍यांसाठी फिरती स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी पिंपरीतील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरात मुक्कामाच्या ठिकाणी सातच्या सुमारास पोहचली. सोहळ्याच्या स्वागतासाठी मंदिराला सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात ढोलताशाच्या पथकांनी पालखीचे जंगी स्वागत केले. पालखीचा मुक्काम असल्याने मंडपदेखील टाकण्यात आला आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pavanagar Dudhiware Ghat: पवनानगरच्या दुधीवरे खिंडीत अचानक दगड कोसळला; कारचे नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

सोहळा मंदिरात आल्यानंतर पिंपरी ग्रामस्थांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली. सायंकाळपासून पालखीच्या दर्शनासाठी पिंपरी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. रविवारी पहाटे पालखी सोहळ्याचे चिंचवडगावकडे प्रस्थान होणार आहे. परतीच्या दिशेने निघालेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी फुगड्या खेळून पालखीचे स्वागत केले.

महापालिकेतर्फे स्वागत

पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. या वेळी शहराच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका प्रियांका कुदळे, निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, उषा वाघेरे, गिरिजा कुदळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पिंपरीगावात पालखी आल्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news