Pavanagar Dudhiware Ghat: पवनानगरच्या दुधीवरे खिंडीत अचानक दगड कोसळला; कारचे नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

धोकादायक दरडींची छाटणी अन् संरक्षक जाळ्यांची मागणी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
Pavanagar Dudhiware Ghat Rockfall
Pavanagar Dudhiware Ghat RockfallPudhari
Published on
Updated on

पवनानगर: पवनानगरकडे जाताना लागणारी घाटातील दुधीवरे खिंड सध्या प्रवाशांसाठी व वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनली असून, या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांमध्ये कायम भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Pavanagar Dudhiware Ghat Rockfall
Dehu Road Accident Hotspot: देहूरोडचा देहू फाटा ठरतोय ‘डेथ स्पॉट’; वारंवार अपघातांमुळे नागरिक संतप्त

या खिंडीत अचानक दगड कोसळल्याची दुर्घटना घडली. ज्यामध्ये एका कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली, तरी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Pavanagar Dudhiware Ghat Rockfall
Pimpri Chinchwad Street Light Safety: पिंपरी-चिंचवडमध्ये विद्युत दिव्यांच्या दुरुस्तीवेळी सुरक्षेचा फज्जा; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

पवनानगर आणि परिसराचा मुख्य संपर्क असलेला हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, येथील खिंडीत दरडी कोसळण्याच्या किंवा दगड सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पावसाळा असो वा नसो, कधीही डोक्यावर दरड कोसळेल या भीतीने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी वारंवार प्रशासनाकडे या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडले आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Pavanagar Dudhiware Ghat Rockfall
Missing Link Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात तुषार भूमकरचा दुर्दैवी अंत; ११ महिन्यांच्या आर्यवीरसह दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले

रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या धोकादायक दरडींची छाटणी करणे, संरक्षक जाळ्या बसवणे किंवा तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे असतानाही संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली आणि यात कोणाचा जीव गेला, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि प्रवास करणाऱ्या वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

Pavanagar Dudhiware Ghat Rockfall
Pimpri Chinchwad Waste To Energy: पिंपरी-चिंचवडमध्ये सप्टेंबरमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू; दररोज ७०० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया

संबंधित प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन या खिंडीतील धोकादायक भाग लवकरात लवकर सुरक्षित करावा, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news