Sangvi Dapodi Crematorium Water Problem: सांगवी-दापोडीतील स्मशानभूमींमध्ये पाण्याची गैरसोय; नळजोडणीअभावी नागरिक त्रस्त

दशक्रिया घाटावरील नळ गायब; सांगवीत स्वच्छतागृहात पाणी नाही, दापोडीत टाकी असूनही जोडणी नाही
Sangvi Dapodi Crematorium Water Problem
Sangvi Dapodi Crematorium Water ProblemPudhari
Published on: 
Updated on: 

दापोडी: सांगवी आणि दापोडी परिसरातील दशक्रिया घाट तसेच स्मशानभूमींमध्ये पाण्याची सुविधा अपुरी असल्याने अंत्यविधी व धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. दापोडी स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची टाकी असूनही नळजोडणी नसल्याने त्यांचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. सांगवी स्मशानभूमीत पाण्याची जोडणी बिघडल्याने स्वच्छतागृहांमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

Sangvi Dapodi Crematorium Water Problem
Pimpri Chinchwad Modified Silencer: पिंपरी-चिंचवडमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरवर दणका; ४१५ सायलेन्सर, ५९१ नंबर प्लेटवर कारवाई

जुनी सांगवीतील स्मशानभूमीत दुर्गंधी

जुनी सांगवी येथील स्मशानभूमीतील स्वच्छतागृहाच्या पाणी कनेक्शनमध्ये बिघाड झाल्याने तेथे पाणीपुरवठा होत नाही. परिणामी स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अंत्यविधीसाठी दुरून येणाऱ्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला यांचाही समावेश असतो. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sangvi Dapodi Crematorium Water Problem
Navratri Fashion Shopping: नवरात्रोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; घागरा-चोली, केडियाला तरुणाईची पसंती

सांगवीतील दशक्रिया घाटावरील नळ गायब

सांगवी परिसरातील दशक्रिया घाटावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला असलेले नळ गायब झाले आहेत. त्यामुळे दशक्रिया व अन्य धार्मिक विधींसाठी घाटावर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना घरून पाणी घेऊन यावे लागत असून, काही वेळा नदीच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ येत आहे. नदीपात्रातील पाणी दूषित असल्याने त्याचा वापर आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Sangvi Dapodi Crematorium Water Problem
Pavana Dam Floating Solar: पवना धरणावर फ्लोटिंग सोलर पॅनेल; महापालिकेचा वीजनिर्मितीचा मोठा प्लॅन

दापोडीत टाकी बसवली; पण नळजोडणी मात्र नाही

दापोडी येथील स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. मात्र, या टाकीला अद्याप नळजोडणी देण्यात आलेली नसल्याने टाकी असूनही त्यात पाणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे अंत्यविधी तसेच दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र व्यवस्था करावी लागत आहे. दशक्रिया घाट आणि स्मशानभूमी या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधा नियमित उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणांची पाहणी करून नळांची दुरुस्ती, पाणी कनेक्शन सुरू करणे, टाक्यांना नळजोडणी देणे तसेच स्वच्छतागृहातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Sangvi Dapodi Crematorium Water Problem
Pimpri Chinchwad Weather: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्टोबर हिटचा कहर; तापमान ३६ अंशांवर

सांगवी दशक्रिया घाट व स्मशानभूमी तसेच दापोडीतील स्मशानभूमीतील पाण्याची होणारी गैरसोय पाहता लवकरच पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात येइल. तसेच, नळजोड देऊन नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्यात येईल.

विजय कांबळे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी सांगवीतील स्मशानभूमीत गेल्यानंतर स्वच्छतागृहात पाण्याची सोय नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागले. स्वतः नागरिकांना पाण्याची सोय करावी लागत असल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगात नागरिकांना पुन्हा अडचणीला सामोरे जाऊ लागू नये. आवश्यक त्या दुरुस्ती वेळोवेळी करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

रवींद्र कांबळे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news