Pimpri Chinchwad Weather: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्टोबर हिटचा कहर; तापमान ३६ अंशांवर

पुढील तीन दिवसांत पारा ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता; दमट हवेमुळे ३८-३९ अंशांची झळ
Heatwave
HeatwavePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्टोबर हिटने कहर केला आहे. शहराचे कमाल तापमान बुधवार (दि. ७) ३६ अंशावर पोचले असून, येत्या ३ दिवसांत ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heatwave
Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक, क्षेत्रीय समिती सदस्यांच्या निवडीला ‘ब्रेक’!

गेल्या आठवड्यात शहरात ३५.७ अंश तापमानाची नोंद झाली होती, त्यानंतर सातत्याने पारा चढतच आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच कडक ऊन आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमान ३५ अंश असले तरी ३८ ते ३९ अंशापेक्षा जास्त गरम जाणवत आहे.

Heatwave
Moshi Golf Course: मोशीतील ६१.३८ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ क्लब; १० आरक्षणे बदलण्याचा प्रस्ताव

वाकड, हिंजवडी, भोसरी, निगडी, चिंचवड या आयटी आणि औद्योगिक पट्ट्यात उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुचाकीस्वार, बांधकाम कामगार, शाळेतील विद्यार्थी आणि बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Heatwave
Pimpri Chinchwad Smart City: पिंपरी-चिंचवाड स्मार्ट सिटी कंपनीला टाळे कधी? १,३७८ कोटींची कामे, तरी सहा महिन्यांपासून विसर्जन रखडले

पुढील ४ दिवस शहरात अशीच स्थिती कायम राहणार असून, हवामान प्रामुख्याने निरभ्र आणि कोरडे राहील. दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेवर पुरळ आणि डीहायड्रेशनचे रुग्ण वाढले आहेत.

Heatwave
Lonavala Connecting Link Accident: लोणावळा कनेक्टिंग लिंकवर ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; दोघे गंभीर

राज्यात एल-निनोचा प्रभाव वाढत असल्याने यंदा ऑक्टोबर हीट अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, सुती कपडे वापरावे आणि शक्यतो सावलीत राहावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news