Ravet Firing Case: रावेत गोळीबारानंतर शहरात गँगस्टर नेटवर्कच्या सावटाची चर्चा

सोशल मीडियातून वाढते गँगस्टर ब्रँडिंग; लॉरेन्स बिष्णोई कनेक्शनच्या चर्चेमुळे पोलिसांची चिंता वाढली
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: रावेत येथील ए. जे. फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबारानंतर शहरातील गुन्हेगारीच्या बदलत्या चेहऱ्याबाबत पुन्हा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत खंडणी, धमक्या आणि टोळी संघर्ष हे स्थानिक गुंडांपुरते मर्यादित मानले जात होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्‌‍सॲप कॉल आणि देशातील कुख्यात गँगस्टरचे नाव वापरत दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढू लागल्याने तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये वारंवार लॉरेन्स बिष्णोई गँगच्या शुभम लोणकरचे नाव समोर येत असल्याने पोलिसांकडून या सर्व घटनांचे धागेदोरे जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Guns
Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing: पिंपरी-चिंचवडमध्ये फर्निचर मॉलवर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकी

गोळीबारीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

रावेतमधील ए. जे. फर्निचर मॉलवरील गोळीबाराने या चर्चेला नवे वळण मिळाले. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी भरदिवसा गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण केली होती. घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आल्याचे समोर आले. हा फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देत पुढील गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली होती. या पोस्टनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक व्यावसायिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.

Guns
Pimpri Crime: पिंपरीत गांजा जप्त; बावधनमध्ये कामगारांना लाकडी बांबूने बेदम मारहाण

शहरात लॉरेन्स कनेक्शनची चर्चा

रावेत प्रकरण ताजे असले, तरी शहरात लॉरेन्स कनेक्शनची चर्चा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. जानेवारी महिन्यात गोल्डन मॅन म्हणून ओळख असलेल्या व्यावसायिक सनी नाना वाघचौरे यांना पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकांवरून व्हॉट्‌‍सॲप कॉल आणि संदेश पाठवत स्वतःला लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते. पैसे दिले नाहीत, तर गोळी कुठूनही येऊ शकते, तसेच तुझाही बाबा सिद्दीकी करू, अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके सक्रिय करून डिजिटल तपास सुरू केला होता.

मात्र, या सर्व घटनांचा पाया आणखी जुन्या एका प्रकरणात असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. वाकड पोलिस ठाण्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सौरभ ढोरे याने चौकशीदरम्यान सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव हा आपला मित्र असल्याचे सांगितले होते. तसेच, राजस्थानमध्ये लॉरेन्स बिष्णोईच्या भावांना भेटल्याचा दावाही त्याने केला होता. संतोष जाधवच्या माध्यमातून मध्य प्रदेशातून गावठी कट्टे मागवल्याची कबुलीही तपासात समोर आली होती. या माहितीमुळे त्या वेळी पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती.

Guns
PCMC Scam 60 Crore: पिंपरी-चिंचवड 60 कोटी घोटाळा प्रकरण राज्य सरकारकडे

या सर्व घटनांमध्ये सोशल मीडिया हा सर्वांत मोठा समान धागा आहे. पूर्वी गुन्हेगारी टोळ्या परिसरातील दहशत, स्थानिक खबऱ्यांचे जाळे आणि प्रत्यक्ष संपर्कातून प्रभाव निर्माण करत असत. आता मात्र इन्स्टाग््रााम रील्स, फेसबुक पोस्ट, व्हॉट्‌‍सॲप स्टेटस आणि टेलिग््राामसारख्या माध्यमांतून गँगस्टर बँडिंग करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. शस्त्रे, महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने आणि धमकीच्या डायलॉग्ससह पोस्ट टाकून स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न काही तरुणांकडून होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

शुभम लोणकर कोण आहे ?

या सर्व प्रकरणांमध्ये वारंवार चर्चेत आलेले नाव म्हणजे शुभम लोणकर. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावचा रहिवासी असलेल्या लोणकरचे नाव प्रथम फेबुवारी 2024 मधील शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाईत समोर आले होते. तपासादरम्यान लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोई यांच्याशी कथित संपर्क असल्याचे धागेदोरे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभम लोणकर महाराष्ट्र नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली आणि लोणकर पुन्हा चर्चेत आला. पुणे कनेक्शनमुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले. वारजे परिसरातील डेअरी व्यवसाय, स्क्रॅप सेंटरमध्ये काम करणारे संशयित आणि पुण्यात बैठका झाल्याचा संशय यामुळे तपास यंत्रणांचे लक्ष पुण्याकडे वळले. फेबुवारी 2026 मध्ये चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही लोणकरचे नाव चर्चेत आले. या प्रकरणात पुण्यातून काही जणांना अटक करण्यात आली होती.

Guns
Nashik Phata Flyover Lights Issue: नाशिक फाटा उड्डाण पुलावर अंधाराचे साम्राज्य; पथदिवे बंद, अपघाताचा धोका वाढला

सोशल मीडिया हालचालींवर वॉच

शहरात प्रत्यक्ष संघटित नेटवर्क कार्यरत आहे की, स्थानिक गुन्हेगार केवळ मोठ्या गँगचे नाव वापरून स्वतःची दहशत निर्माण करत आहेत, हे स्पष्ट करणे तपास यंत्रणासमोर आव्हान आहे. त्यासाठी संशयितांचे कॉल डिटेल्स, सोशल मीडिया हालचाली, आर्थिक व्यवहार, डिजिटल लोकेशन आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. विशेष म्हणजे अलीकडे खंडणी आणि धमकीच्या पद्धतीतही मोठा बदल झाल्याचे समोर येत आहे. आता थेट भेटीगाठी किंवा स्थानिक दबावतंत्र ऐवजी डिजिटल माध्यमांतून दहशत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक, फेक सोशल मीडिया अकाउंट्‌‍स, एन्क्रिप्टेड मेसेजिंग आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर वाढल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

फॉलोवर्स रडारवर

रावेत गोळीबारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील काही संशयित हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियावर गँगचे समर्थन करणारे, शस्त्रांसह व्हिडिओ पोस्ट करणारे किंवा संशयास्पद संपर्कात असलेल्या तरुणांची माहिती गोपनीयरीत्या गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये बाहेरील गँगस्टर नेटवर्कचे सावट निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news