Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing: पिंपरी-चिंचवडमध्ये फर्निचर मॉलवर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकी

एजे फर्निचर मॉलसमोर अज्ञातांकडून फायरिंग; सोशल मीडियावरील धमकी पोस्टमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing
Lawrence Bishnoi Gang FiringPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एजे फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार करत दहशत निर्माण केली. या घटनेनंतर सोशल मीडियावरून थेट जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing
Pimpri Crime: पिंपरीत गांजा जप्त; बावधनमध्ये कामगारांना लाकडी बांबूने बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून एजे फर्निचर मॉलसमोर आले. त्यांनी मॉलच्या दिशेने गोळ्या झाडत परिसरात दहशत पसरवली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटना घडल्यानंतर आरोपी काही क्षणांतच पसार झाले.

Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing
PCMC Scam 60 Crore: पिंपरी-चिंचवड 60 कोटी घोटाळा प्रकरण राज्य सरकारकडे

दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्वीकारल्याचे समोर आले आहे. संबंधित पोस्टमध्ये मॉल मालक अशोक नयन यांच्यावर एमडी ड्रग्स आणि हवाला व्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात घालू,” अशी धमकीही देण्यात आली आहे.

Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing
Nashik Phata Flyover Lights Issue: नाशिक फाटा उड्डाण पुलावर अंधाराचे साम्राज्य; पथदिवे बंद, अपघाताचा धोका वाढला

पोस्टमध्ये ‘वीर फर्निचर’शी संबंधित मुकेश सहराना यांचाही उल्लेख करण्यात आला असून त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing
Pimpri Chinchwad Fuel Protest: इंधन बचतीचा संदेश की राजकीय नाट्य? पिंपरी-चिंचवडमध्ये सायकल ते बैलगाडी आंदोलन

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता आणि त्यामागील कनेक्शन याचाही तपास केला जात आहे. गोळीबारामागे खंडणी, गँगवॉर किंवा अन्य कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र सोशल मीडियावरून खुलेआम देण्यात आलेल्या धमक्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news