Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पुन्हा विलंबाच्या भोवऱ्यात

प्रकल्प 2027 पर्यंत लांबण्याची शक्यता; आयटी प्रवाशांमध्ये नाराजी वाढली
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणेकरांसाठी विशेषतः आयटी क्षेत्रातील लाखो नोकरदारांसाठी महत्त्वाचा ठरणारा हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्ग 3 प्रकल्प पुन्हा एकदा विलंबाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाकडून 15 जूनपासून प्रवासीसेवा सुरू करण्याचे संकेत दिले जात असले, तरी प्रत्यक्ष कामाची स्थिती पाहता हा मुहूर्त पुन्हा हुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आयटी कॉरिडॉरमधील प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.

Pune Metro
Pimpri Chinchwad Free School Books: पिंपरी-चिंचवडमध्ये 1.62 लाख पुस्तकांची मागणी; विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके

8,313 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) मार्फत केली जात आहे. प्रकल्पाच्या आर्थिक प्रगतीचा वेग मोठा असला, तरी भौतिक कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत.

Pune Metro
Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये जलतरण तलावात 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

उपलब्ध आकडेवारीनुसार, मे अखेरपर्यंत प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी तब्बल 97.40 टक्के निधी खर्च झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाची प्रगती 94.58 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे निधी खर्च आणि कामाची गती यामध्ये तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Pune Metro
Pimpri Yamunanagar Hospital: यमुनानगर रुग्णालयाचा विस्तार रेडझोनमुळे रखडला

पहिल्या टप्प्यातील स्थानके अजूनही प्रतीक्षेत

पहिल्या टप्प्यात हिंजवडीकडील 12 स्थानके सुरू करण्याचे नियोजन होते. यामध्ये मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज-2, विप्रो, वाकड चौक आणि बालेवाडी स्टेडियम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. मात्र, अनेक ठिकाणी अंतिम चाचण्या आणि सुविधा पूर्ण न झाल्याने हा विलंब आणखी वाढणार आहे.

Pune Metro
Pimpri Chinchwad DP Plan: डीपीवरून पिंपरी-चिंचवडमध्ये वादंग; 49 हजार हरकती, तरीही सुनावणी रखडली

2027 पर्यंत प्रकल्प लांबण्याची शक्यता

23.203 किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेचे पूर्ण काम ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, सध्याची मंद गती आणि अपूर्ण कामे पाहता प्रकल्प 2027 पर्यंत लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news