

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने समग््रा शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 62 हजार 69 पुस्तकांची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळावीत असे महापालिकेचे नियोजन असते. त्यानुसार, महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.
दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असल्यामुळे शालेय साहित्य खरेदीची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने हे नियोजन केले आहे. समग््रा शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.
सेमी इंग््राजीच्या 50 हजार पुस्तकांची मागणी
यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 8 पर्यंतच्या मराठी, हिंदी, इंग््राजी, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 11 हजार 466 पुस्तकांची मागणी केली आहे. सेमी इंग््राजीच्या 1 ली ते 8 वीच्या चार शाळांतील विद्यार्थी संख्येनुसार 50 हजार 603 पुस्तकांची मागणी केली आहे.
याबरोबरच आकुर्डी व पिंपरी शहर साधन केंद्रातील सर्व मनपा शाळा, खासगी, अनुदानित, शासकीय, आश्रमशाळांनी इयत्ता 1 ली ते 8 च्या मराठी, हिंदी, उर्दू, सेमी इंग््राजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकाची मागणी केली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तके प्राप्त होणार आहेत.