Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये जलतरण तलावात 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

पोहायला शिकताना दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ
Drowning death
Drowning deathPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पोहायला शिकत असताना पाण्यात बुडाल्याने 17 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी साडेअकराच्या सुमारास केशवनगर, चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव येथे घडली. श्रवण समीर गायकवाड (17, रा. द्वारका साई सोसायटी, गोलांडे चौक, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

Drowning death
Pimpri Yamunanagar Hospital: यमुनानगर रुग्णालयाचा विस्तार रेडझोनमुळे रखडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण हा आपल्या मित्रांसोबत गावडे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आला होता. तो पोहायला शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो पाण्यात उतरला. मात्र, काही वेळानंतर तो वर न आल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही बाब तेथील जीवरक्षकांच्या निदर्शनास आणून दिली.

Drowning death
Pimpri Chinchwad DP Plan: डीपीवरून पिंपरी-चिंचवडमध्ये वादंग; 49 हजार हरकती, तरीही सुनावणी रखडली

जीवरक्षकांनी शोध घेऊन श्रवण याला पाण्याबाहेर काढले. त्या वेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रहाटणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Drowning death
Golden Maize Farming: पवन मावळमध्ये गोल्डन मक्याची शेतीत वाढ

जीवरक्षकांवर कारवाईची मागणी

दरम्यान, या घटनेचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. गावडे जलतरण तलाव आकाराने लहान असून, तेथे चार जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Drowning death
Pimpri News: महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सायकलवरून महापालिका भवनात

घटना घडली त्या वेळी जीवरक्षक नेमके काय करत होते?, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदार आणि जीवरक्षकांवर कारवाई करावी, तसेच मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news