Chikhli Reserved Plot Misuse: चिखलीतील आरक्षित भूखंडाचा गैरवापर; महापालिकेने कचऱ्याचे डेपो केले मैदान

खेळाडूंचा सराव बंद, रहिवाशांच्या आरोग्याला धोका; तातडीच्या कारवाईची मागणी
Reserved Plot Misuse
Reserved Plot MisusePudhari
Published on
Updated on

चिखली: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आता चिखलीतील उदयोन्मुख खेळाडू आणि स्थानिक रहिवाशांना बसू लागला आहे. पिंगळे रोडवरील इम्पेरियल हॉस्पिटलसमोरील गट क्रमांक 1193/7 हा भूखंड महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पार्किंगसाठी आरक्षित असला, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने या जागेचा वापर अडगळीचे सामान टाकण्यासाठी सुरू केला आहे.

Reserved Plot Misuse
Mumbai Pune Expressway Traffic Jam: 36 तासांनंतर मुंबई–पुणे एक्सप्रेस वे झाला मोकळा; गॅस टँकर अपघाताने प्रवाशांचे हाल

राडारोडा, फ्लेक्स, भंगाराचा खच

या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राडारोडा, जुने फ्लेक्स आणि भंगार साहित्य टाकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चिखली परिसरात खेळासाठी हक्काचे एकही मैदान उपलब्ध नसताना मुले ज्या जागेवर कबड्डी आणि इतर खेळांचा सराव करत होती, तिथे आता घाणीचे सामाज्य पसरले आहे. सभोवताली रहिवासी परिसर आहे. या मोकळ्या जागेत कचरा साचतो. पावसाळ्यात या परिसरात डासांचे प्रादुर्भाव वाढतो. दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इतकेच नव्हे, तर या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापांचा वावर वाढल्यानचेही स्थानिक नागरिक सांगतात.

Reserved Plot Misuse
PCMC NQAS Certificate: पिंपरी-चिंचवडच्या तीन आरोग्य केंद्रांना एनक्यूएएस राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

प्रशासनाचे दुर्लक्ष

या गंभीर समस्येबाबत माजी नगरसेवक विकास साने, लोकप्रतिनिधी यश साने, संगीता नानी ताम्हाणे यांनी वारंवार महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष संवाद साधला आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत तातडीने उपाययोजना राबवल्या जातील, असे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे चिखलीतील गुणवंत खेळाडूंना सरावापासून वंचित राहावे लागत असून, एका आरक्षित भूखंडाचे रूपांतर डम्पिंग ग््रााऊंडमध्ये झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव संताप व्यक्त केला आहे.

चिखली परिसरातील खेळाडूंसाठी ही जागा एकमेव आधार होती. पार्किंगचे आरक्षण विकसित होईपर्यंत किमान खेळाडूंना सरावासाठी ही जागा मोकळी ठेवणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण विभागच येथे कचरा आणि राडारोडा टाकून खेळाडूंच्या भवितव्याशी खेळत आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन सुस्त आहे. जर तातडीने हा भूखंड स्वच्छ केला नाही तर, आम्हाला खेळाडू आणि नागरिकांसह तीव्र आंदोलन करावे लागेल.

विकास साने, नगरसेवक

Reserved Plot Misuse
Pimpri Chinchwad Murder Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये खुनांची संख्या घटली; प्रेम व अनैतिक संबंध ठरले मुख्य कारण

याबाबत लवकरात लवकर माहिती घेतली जाईल आणि संबंधित समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही.

श्रावण हर्डीकर, आयुक्त

Reserved Plot Misuse
Chakan Murder Case: पिंपरीत धक्कादायक प्रकार; मुलाने मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराचा निर्घृण खून

आरक्षित भूखंडाचा असा दुरुपयोग होणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. रहिवासी भागात कचरा आणि भंगार टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, तिथे साप निघण्याच्या घटना घडत आहेत. महापालिकेने हा राडारोडा त्वरित हटवून ही जागा खेळाडूंना पुन्हा उपलब्ध करून द्यावी.

यश साने, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news