Police Social Media Rules: पोलिसांच्या रील्सवर लगाम; सोशल मीडियासाठी कडक नियम

नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांना अंमलबजावणीचे आदेश
Police Social Media
Police Social MediaPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: सोशल मीडियावर रील्स, व्हिडिओ आणि वैयक्तिक प्रसिद्धीसाठी सक्रिय असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता लगाम लावण्यात आला आहे. राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सोशल मीडिया वापराबाबत कडक परिपत्रक जारी करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनाही काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Police Social Media
Pimpri Chinchwad Bicycle Sharing Project: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सायकल शेअरिंग; स्थायी समितीकडून विकासकामांना मंजुरी

गोपनीयतेचे पालन करण्याच्या सूचना

या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमधून पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी स्पष्ट चौकट निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत कामकाज, माहिती प्रसारण आणि वैयक्तिक वापर वेगळा ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच, डिजिटल प्लॅटफॉर्मवर वावरताना संस्थेच्या प्रतिमेची जपणूक आणि गोपनीयतेचे पालन ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या पोलिसांना आता ठरावीक मर्यादा आणि जबाबदाऱ्यांच्या चौकटीतच राहावे लागणार आहे.

Police Social Media
Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात; 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार

वर्दीवर तयार होणाऱ्या रील्सचे प्रमाण वाढले

अलीकडच्या काळात वर्दीवर तयार होणाऱ्या रील्स व व्हिडिओंचे प्रमाण वाढल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले आहे. कार्यालयीन परिसर किंवा अधिकृत साधनांचा वापर करून तयार होणाऱ्या अशा कंटेंटमुळे संस्थेच्या कामकाजाबाबत चुकीचे संदेश जाण्याची तसेच संवेदनशील बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील उपस्थिती अधिक जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ठेवण्याची गरज अधोरेखित झाली होती.

Police Social Media
Maval APMC Board Dismissed: मावळ बाजार समिती बरखास्त; सभापती निवडणुकीनंतर राजकीय नाट्य

काय करू नये?

गोपनीय किंवा तपासाशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. वर्दी, पोलिस वाहन, शासकीय साधने किंवा कार्यालयीन परिसराचा वापर करून रील्स, व्हिडिओ किंवा पोस्ट तयार करणे टाळावे. भामक किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे तसेच व्देष किंवा बदनामीकारक मजकूर टाकणे नियमबाह्य ठरणार आहे. अधिकृत परवानगीशिवाय कागदपत्रे, फोटो किंवा व्हिडिओ अपलोड अथवा फॉरवर्ड करण्यास बंदी आहे.

काय करणे बंधनकारक?

सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारी व सजगता राखणे आवश्यक आहे. वैयक्तिक आणि शासकीय खाती स्वतंत्र ठेवावीत. अधिकृत माहिती केवळ अधिकृत माध्यमांतूनच प्रसारित करावी. कोणतीही पोस्ट करताना पोलिस दलाची प्रतिमा जपली जाईल, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.

Police Social Media
Pimpri Heatstroke Prevention: पिंपरीत उष्माघाताचा इशारा; महापालिका रुग्णालये सज्ज

नियम कोणावर लागू?

हे नियम पोलिस आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून, कंत्राटी, प्रतिनियुक्तीवरील तसेच विभागाशी संलग्न घटकांतील कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे विभागाशी संबंधित प्रत्येकाने या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

गृह विभागाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानेही या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया वापराबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

गणेश इंगळे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news