Pimpri Chinchwad Bicycle Sharing Project: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सायकल शेअरिंग; स्थायी समितीकडून विकासकामांना मंजुरी

पिंपळे सौदागरमध्ये प्रायोगिक सुरुवात; कोट्यवधींच्या प्रकल्पांना हिरवा कंदील
Bicycle
BicyclePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात बंद करण्यात आलेला पब्लिक बायसिकल शेअरींग उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपळे सौदागर येथे दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. यासह विविध विकासकामांच्या खर्चांना स्थायी समितीने बुधवार (दि. 15) झालेल्या सभेत मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. यावेळी समितीचे सदस्य, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप व अधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने मोठा गाजावाजा करीत शहरात पब्लिक बायसिकल शेअरींग उपक्रम सुरू करण्यात आला होता.

Bicycle
Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात; 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार

मात्र, नागरिकांच्या प्रतिसादाअभावी तसेच, सायकलची चोरी व मोडतोड झाल्याने तो उपक्रम गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. तोच उपक्रम आता भोसरी येथील प्रीवाई टेक्नॉलॉजीस प्रा. लि. कंपनीच्या सहकार्याने महापालिका शहरभरात राबत आहे. त्यातील 10 टक्के उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. सायकल भाडे तसेच, स्टॅण्डवर जाहिरात प्रदर्शन करून ती कंपनी उत्पन्न मिळवणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर येथे दोन ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 2 तास सायकल भाड्याने दिल्या जाणार आहेत. सामान्य सायकलसाठी प्रति मिनिट 25 पैसे तर, मासिक पास 350 रुपये आहे. इलेक्ट्रिक सायकलसाठी प्रति मिनिट 50 पैसे तर, मासिक भाडे 550 रुपये आहे. सायकलसाठी एका दिवसाचा पास 60 रुपये आणि इलेक्ट्रिक सायकलचे भाडे 100 रुपये आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास तो संपूर्ण शहरात राबवला जाणार आहे, असे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

Bicycle
Maval APMC Board Dismissed: मावळ बाजार समिती बरखास्त; सभापती निवडणुकीनंतर राजकीय नाट्य

विविध खर्चास समितीची मान्यता

शहरातील झोपडपट्टी व दाटवस्ती भागांमध्ये गटर करणे. स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे. शहरातील रस्ते व वाहतूक सुधारण्यासाठी निगडी-दापोडी रस्त्यावरील बसस्थानक व डेडिकेटेड लेन दुरुस्तीसाठी 31 लाख 46 हजार रुपये खर्च करणे. सांगवी-किवळे बीआरटी रस्त्याचे डांबरीकरण करणे. निगडी टिळक चौक ते दुर्गानगर रस्त्यावरील कामे करणे. प्रभाग क्रमांक 24 मधील सदाशिव कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, आनंद पार्क परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण करणे.आकुर्डी रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयातील क्ष-किरण विभागासाठी बॅटरी खरेदी करणे. नवीन थेरगाव गावठाण येथे 340 खाटांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी फर्निचर खरेदी करणे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मानधन तत्त्वावर विविध पदांची भरती करणे. आरोग्य विभागासाठी 4 सक्शन युनिट वाहने व प्रत्येकी 2 मजूर उपलब्ध करून देण्यासाठी 3 कोटी 55 लाख 23 हजार खर्च करणे. महापालिका शाळांमध्ये प्राथमिक विभागासाठी 120 व माध्यमिक विभागासाठी 18 असे एकूण 138 एन्ट्री ऑपरेटर 24 महिन्यांसाठी नेमण्यासाठी 10 कोटी 14 लाख 47 हजार रुपये खर्च करणे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, प्रगतीपुस्तके व प्रवेश फॉर्म छपाई करण्यास 18 लाख रुपये खर्च करणे. पीएमपीएलच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षातील नियमित संचलन तुटीसाठी 22 कोटी 26 लाखांचे अनुदान देणे, आदी खर्चा स्थायी समितीने मान्यता दिली.

Bicycle
Pimpri Heatstroke Prevention: पिंपरीत उष्माघाताचा इशारा; महापालिका रुग्णालये सज्ज

सुनावणीच्या टप्प्यात डीपीची पुस्तिका मराठी भाषेत छापणार

महापालिकेने सुधारित विकास योजना आराखडा (डीपी प्लान) ची पुस्तिका इंग््राजी भाषेत छापली होती. शहरातील अनेक नागरिकांना डीपीची संपूर्ण माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना आरक्षणाबाबत हरकत किंवा सूचना नोंदवता आली नाही. या संदर्भात अनिश काळभोर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे यांनी नगर रचना विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत दै. पुढारीनेही ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सुधारित डीपी प्लानची 460 पानांच्या पुस्तिकेचे मराठीत भाषांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी 4 लाख रुपये शुल्क आहे. ते शुल्क विभागीय सहायक भाषा संचालक कार्यालयास देण्यात येणार आहे. या पुढे डीपीची पुस्तिका इंग््राजीसह मराठी भाषेत तयार केली जाणार आहे, असे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले. दरम्यान, हरकती स्वीकारुन सुनावणीची प्रक्रिया येऊन ठेपली असताना, पुस्तिकेचे मराठी भाषांतर करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Bicycle
Online Booking Scam: द्वारका यात्रेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; पिंपरीतील ज्येष्ठ नागरिकाला गंडा

पिंपळे गुरवमधील कल्पतरू चौकात भुयारी मार्ग

पिंपळे गुरव येथील वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावर कल्पतरू चौकात (म्हसोबा चौक) भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्या कामासाठी सहा सल्लागारांनी सहभाग घेतला. त्यातील इंफाकिंग कन्सल्टिंग इंजिनियर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एजन्सीला एकूण कामाच्या 1.90 टक्के शुल्क दिले जाणार आहे. वाहतूक व नागरी नियोजनाच्या दृष्टीने पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमणूक करण्यात आली आहे.

आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उत्पन्न वाढीचे विषय तहकूब

उड्डाण पूल, भुयारी मार्गावर 10 वर्षांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एकूण 15 हजार 87 विद्युत खांबांवर 3 फूट बाय 4 फूट आकाराचे किऑक्स 5 वर्षे लावणे. शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील एकूण 97 दिशादर्शक फलकावर 5 वर्षे जाहिरात प्रसिद्ध करणे, या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे तीन विषय समितीने तहकूब केले. तसेच, मेट्रोच्या कामामुळे निगडी ते चिंचवडचा सर्व्हिस रस्ता खराब झाला आहे. तो रस्ता दुरूस्ती होईपर्यंत महामेट्रोला 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. महामेट्रो व्यवस्थापनाने 15 दिवसांत रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे निधी देण्याचा विषय आखणी दोन आठवडे तहकूब करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news