PMRDA Online Services GIS Blockchain: नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा, GIS व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची सोय

घरबसल्या सेवा व सुरक्षित माहितीसाठी पीएमआरडीएने डिजिटल उपक्रम सुरू केले, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद
PMRDA
PMRDA Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तत्पर करण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी नियोजन अधिक अचूक व प्रभावी करण्यासाठी जीआयएस पोर्टल सुरू करण्यात आले असून, उपग्रह प्रतिमा व प्रगत जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. त्यातच ब्लॉकचेन प्रणालीमुळे माहिती सुरक्षित, अपरिवर्तनीय ठेवली जात असून, माहितीची पडताळणी देखील सुलभ होईल, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

PMRDA
Kamshet Maval Elections 2026: मावळ निवडणुकीपूर्वी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

या उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार असून, अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांना आळा बसला आहे. पीएमआरडीएने टीडीआर नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली बनावट कागदपत्रे व फसवणूक रोखण्यास मदत करणार असून, पुढील काही धोका टळणार असून, पारदर्शक, अपरिवर्तनीय आणि सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहेत.

PMRDA
Maval Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादीचा साम्राज्यरॅली सामना

ॲमिनिटी प्लॉट्सच्या निर्मिती, विक्री व विकासप्रक्रियेत ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जमिनीच्या वास्तविक मालकीचा तपशील, सार्वजनिक सुविधांचा अंतिम विकास तसेच लिलाव करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होईल. महानगराचे नियोजन अधिक अचूक व परिणामकारक करण्यासाठी जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

PMRDA
Maval Panchayat Election 2026: भाजप-शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर, विकासभ्रष्टाचारावर टीका

विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करते. डिजिटल तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर करून पीएमआरडीएने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी केले आहे. घरबसल्या सेवा ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे राबवण्यात आल्याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

PMRDA
Chikhali Dust Pollution: चिखली परिसर धुळीच्या विळख्यात; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डिजिटल तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर करून पीएमआरडीएने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी केले आहे. ‌‘घरबसल्या सेवा‌’ ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. त्याचा आढावा घेण्यात येत आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news