PMPML Bus Timing: पीएमपी बसला उशीर झाला तरी एका क्लिकवर कळणार! चालक-वाहकांच्या कामकाजावरही डिजिटल नजर

तिकीट यंत्रणा आणि बस संचालनाच्या प्रणाली जोडल्या; नियोजित व प्रत्यक्ष वेळेची तुलना करून विलंबाचे कारण शोधणे शक्य
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पीएमपीएमएलच्या बस वेळेवर धावतात की नाही, यावर डिजीटल नोंदीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणे शक्य झाले आहे. बसची नियोजित वेळ, प्रत्यक्ष सुटण्याच्या वेळी,फेरी पूर्ण झाल्याची नोंद आणि संबंधित चालक-वाहकांची माहिती एकाच क्लिकवर कळणार आहे. पुणे महानगर परिवहन मंहामंडळाच्या प्रवाशांना आता कोणत्या मार्गावर,कोणत्या आगारातून आणि कोणत्या फेरीला विलंब झाला हे तत्काळ तपासणे शक्य होणार आहे.

PMPML
ST Bus Concession: एसटीच्या सवलतीसाठी आता कार्डची प्रतीक्षा नको! QR कोडच्या पावतीवर ३० दिवस प्रवास

या व्यवस्थेमुळे बसच्या वेळापत्रकामध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. पीएमपीएमएलमध्ये तिकीट यंत्रणेतील नोंदी आणि बस संचालनाशी संबंधित माहिती एकत्र आणण्यासाठी दोन डिजीटल प्रणाली जोडण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून या व्यवस्थेचा वापर सुरु करण्यात आला.

PMPML
Pimpri Chinchwad Construction Ban: पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन बांधकामांना ब्रेक लागणार? दुष्काळामुळे महापालिकेच्या निर्णयाकडे लक्ष

चालक-वाहकांच्या कामकाजावर विशेष लक्ष

बस क्रमांक, मार्ग क्रमांक, संबंधित आगार, वाहकाची ओळख तसेच फेरी सुरु झाल्याची आणि पुर्ण झाल्याची नोंद उपलब्ध होते. नियोजित आणि प्रत्यक्ष वेळेची तुलना करुन विलंब नेमका कुठे झाला, हे तपासता येणार आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Housing Projects: पिंपरी-चिंचवडमध्ये ६ महिन्यांत ६७२ गृहप्रकल्पांना मंजुरी; महापालिकेला ३८३ कोटींचा महसूल

किती फेऱ्यांना उशिरा झाला याची माहिती मिळते. विलंब झालेल्या फेरीची नोंद उघडल्यावर संबंधित तपशील समोर येतो. त्यानुसार आगार व्यवस्थापकांना खुलासा मागविता येतो. त्यामुळे चालक- वाहकांच्या कामकाजावर देखरेख ठेवून जवाबदारी निश्चित करणे शक्य होते. डिजीटल नोंदीमुळे विलबांची माहिती तात्काळ मिळत असली, तरी बस वेळेवर धावण्यास अनेक अडथळे आहेत. सकाळच्या सत्रात वेळपालनाचे प्रमाण ९७ ते ९८ टक्क्यापर्यंत असते.

PMPML
Indrayani River Water Shortage: ऑक्टोबरमध्येच इंद्रायणी नदीपात्र कोरडे; मावळमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

मात्र संध्याकाळी रस्त्यांवरीवल वाहतूक कोंडीमुळे बस नियोजित वेळेत पोहचत नाहीत. दुसऱ्या पाळीसाठी चालक- वाहक वेळेत हजर न झाल्यास पुढील फेऱ्यांचे नियोजनही विस्कळीत होते. एका फेरीला झालेला विलंब पुढील फेरीवर परिणाम करु शकतो, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news