Indrayani River Water Shortage: ऑक्टोबरमध्येच इंद्रायणी नदीपात्र कोरडे; मावळमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

वडगाव, कामशेतसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता; नदीपात्रातील घटत्या पाणीपातळीमुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत
Indrayani River
Indrayani RiverPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या व मावळ तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात ऑक्टोबर महिन्यातच पाणी कमी होऊन नदीपात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Indrayani River
Diwali Dry Fruits Demand: दिवाळी फराळासाठी सुक्यामेव्याला मागणी; मनुका, पिस्ते, जर्दाळूच्या खरेदीला वेग

मावळ तालुक्यातील वडगाव, जांभुळ, कान्हे, नायगाव, कामशेत या मोठ्या गावांसह अनेक गावांसाठी इंद्रायणी नदी हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. नदीच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेती आणि स्थानिक जनजीवन मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यातच नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होऊन काही ठिकाणी पात्र कोरडे पडू लागल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता किती राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Indrayani River
Police Officer Death: गुन्हेगाराचा पाठलाग करताना काळाचा घाला; पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील जावेद बागसिराज यांचे निधन

पावसाळा संपताच नदीची पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र समोर येत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याचे दिवस अद्याप दूर असतानाच नदीपात्राची अशी अवस्था होत असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. नदीतील पाणी कमी होण्यामागे पावसाचे प्रमाण, पाण्याचा उपसा, भूजलपातळी आणि नदीतील नैसर्गिक प्रवाह यांसारख्या घटकांचा प्रभाव असू शकतो. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

Indrayani River
Pimpri Chinchwad Water Leakage: पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ टक्के पाणीगळती; १० टक्के कपात, तरी प्रशासनाचे दुर्लक्ष?

पाण्याच्या योजनांवर परिणाम होण्याची भीती

सध्या नदीपात्रातील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली असेल, तर पुढील काही महिन्यांत परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः नदीवर अवलंबून असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. पाणीपुरवठा कमी झाल्यास नागरिकांना पर्यायी स्रोतांचा आधार घ्यावा लागू शकतो. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता घटल्यास शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Indrayani River
Pimpri Chinchwad Firecracker Stall Permission: पिंपरी-चिंचवडमध्ये फटाका स्टॉलसाठी कडक नियम; विनापरवाना विक्री केल्यास कारवाई

ठोस नियोजनाची गरज

नदीपात्रातील पाणी कमी होण्याची कारणे शोधून मावळातील गावांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याचा प्रश्न नागरिकांसमोर गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक

पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे, अनावश्यक उपसा टाळणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. इंद्रायणी नदीपात्राची ऑक्टोबर महिन्यातच खालावत चाललेली स्थिती ही आगामी पाणी व्यवस्थापनासाठी सावध करणारी बाब ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news