Pimpri Chinchwad Schools Pink Room Facility: पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘पिंक रूम’ची प्रतीक्षा; मासिक पाळीमुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम

सुरक्षित सुविधा कक्षाचा शासनाचा आदेश रखडला; जागेअभावी महापालिका व खासगी शाळांमध्ये अंमलबजावणी अपूर्ण
Pink Room
Pink RoomPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: मासिक पाळीमुळे मुलींचे शिक्षण अधांतरी राहू नये आणि शाळेतील त्यांची उपस्थिती शंभर टक्के असावी, शाळांमधील ‌'ड्रॉपआऊट‌'चे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ‌'पिंक रूम‌' (स्वतंत्र सुविधा कक्ष) सारख्या आधुनिक संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्याच वर्षी शाळांमध्ये पिंक रूम करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, महापालिका आणि खासगी शाळांमध्ये पिंक रुमची संकल्पना अपूर्णच स्थितीमध्ये आहे.

Pink Room
Moshi Waste Depot Accident: मोशी कचरा डेपो ठप्प; पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचे ढीग वाढले, शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

पिंक रुममुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थिनींना शाळेत सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणार आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जागेच्या अभावी हा सुविधा कक्ष करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पिंक कक्षाअभावी यंदाही मुलींच्या वाट्याला कुचंबणा येत आहे. मासिक पाळी ही स्त्रीच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाची बाब असली तरी अजूनही बंधने, रुढी चुकीच्या समजुतीमुळे मुलींना प्रचंड शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये पिंक रूम सुरू केल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच शासकीय आणि खासगी शाळांमध्ये अशा पिंक रूम सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे.

Pink Room
Moshi Garbage Depot Accident: महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस; ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा

शहरामध्ये पालिका आणि खासगी एकूण 650 शाळा आहेत. इयत्ता 6 वी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींसाठी शाळांमध्ये पिंक रूम असायला हवी असा आदेश आहे. त्यामुळे प्राथमिक विभागाच्या शाळांनादेखील हा नियम लागू होतो. शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थिनींना पाळीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, म्हणून महापालिका काही सामाजिक संस्था किंवा बचत गटाकडून स्वस्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जातात. या मशिन्सव्दारे आता शाळेच्या वेळेत विद्यार्थिंनीना केव्हाही सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होत आहे. शाळेत बसविलेल्या मशिन्समधील पॅडचा वापर करताना दिसत आहे. मात्र, त्यांना आरामाची गरज भासल्यास कोणताही स्वतंत्र कक्ष नाही.

Pink Room
POCSO Court Building: पोक्सो न्यायालयाच्या इमारतीला ‘तारीख पे तारीख’; पीएमआरडीएची मुदतवाढ, तरी काम संथच

अभावाची मुख्य कारणं

  • निधीचा अभाव - वेंडिंग मशीन

  • जागा नाही - मनपा शाळांमध्ये वर्गच कमी आहेत

  • जागरुकतेचा अभाव - मुख्याध्यापक/पालक यांना महत्त्व कळत नाही

  • देखभाल कोण करणार - जबाबदारी ठरलेली नाही

अभावामुळे काय होतं?

  • गैरहजेरी वाढते - पाळीच्या ३ - ४ दिवस मुली शाळा बुडवतात.

  • स्वच्छतेचा प्रश्न - टॉयलेटमध्ये सुविधा नसल्याने इन्फेक्शन, आजार

  • लाज अन् भीती - गणवेश खराब झाल्यास मुलगी दिवसभर तणावात

  • शिक्षणावर परिणाम - महत्त्वाचे तास, परीक्षा देण्यावर परिणाम

  • शाळा सोडण्याचे प्रमाण - ८ वी नंतर मुलींचे ड्रॉपआऊट वाढते

पिंक रूम म्हणजे काय?

पिंक रूम म्हणजे शाळा, महाविद्यालय किंव सार्वजनिक ठिकाणी मुलींसाठी खास तयार केलेली स्वतंत्र आणि सुरक्षित जागा, जिथे मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. साधारणत: या कक्षात सॅनिटरी पॅडची सुविधा, टेबल - खुर्ची, बेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक उपचार साहित्य, मासिक पाळीबद्दल माहिती देणारे फलक. शाळांमध्ये साधारणपणे 15 बाय 15 फूट आकाराची ही पिंक रूम असणार आहे. जागा उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये 18 फूट बाय 22 फूट आकाराची वर्गखोली ‌'पिंक रुम‌' म्हणून वापरण्यात येणार आहे.

Pink Room
Moshi Building Collapse: वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ठेकेदारावर अखेर गुन्हा दाखल

पालिकेच्या मुलींच्या एकूण 22 शाळा

महापालिकेच्या स्वतंत्र मुलींच्या एकूण 22 शाळा आहेत. मनपा शाळांमधील मुली या आर्थिक दुर्बल घटकातील असतात. अचानक मासिक पाळी आल्यानंतर शाळेतून सॅनिटरी पॅड देण्याची सुविधा असते. मात्र, काहीवेळा मुलींना पोटदुखी, पित्त, चक्कर, अशक्तपणा या गोष्टींचा सामना करावा लागतो. या वेळी मुलींना शाळेतून घरी जावे लागते. काहींना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. घरातदेखील आरामदायी वातावरण नसते. अशावेळी पिंक रूममुळे मुलींना शाळेतच आरामदायी वातावरण मिळणार आहे.

पिंक रूममुळे मिळणार सुरक्षा

मासिक पाळी वेळी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे यासाठी ‌'पिंक रूम‌' ही सुरक्षित जागा मिळणार आहे. तसेच शाळांमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा, पीटीच्या तासाला कपडे बदलण्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर केला जातो. चेजिंग रुमची अशी वेगळी व्यवस्था नाही. ‌'पिंक रूम‌'चा वापर क्रीडा, योग व पीटी तासादरम्यान कपडे बदलण्यासाठी होणार आहे.

काही शाळांना वर्गच अपुरे असल्याने पिंक रूमला जागाच नाही. जागेअभावी पिंक रूम करणे शक्य नाही. ज्या शाळांत मुलींची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पिंक रुम करणार आहोत. आम्ही एका शाळेतच प्रयोगिक तत्त्वावर पिंक रूम करणार आहोत. यंदा टप्प्याटप्प्याने त्याचे काम करू.

संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिं.चिं.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news